Saturday, November 16, 2024

Latest Posts

मी 14 वेळा निवडणूक लढलो, त्यापैकी…… 

| TOR News Network | Sharad Pawar Statement On Ncp Symbol : ज्याने पक्ष उभारला,त्याला योग्य दिशा दिली व विस्तार केला त्याचा पक्ष काढून घेतला, असं यापूर्वी देशात कधी झालं नाही. मात्र राष्ट्रवादीच्या निमित्ताने असं प्रथमच घडलं. मात्र संघटनेचे चिन्ह किंवा पक्ष गेल्यामुळे अस्तित्व संपत नाही, असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नमूद केले.

बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी माळशिरस तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला, त्यावेळी त्यांच्यासमोर शरद पवारांनी हा निर्धार बोलून दाखवला. यापूर्वी देशामध्ये अनेकदा पक्षाच्या संदर्भात घडामोडी घडल्या, ज्याने पक्ष स्थापन केला त्याचाच पक्ष काढून घेणे हे कायद्याला धरून वाटत नाही, त्यामुळेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. त्याचा योग्य निकाल लागेल अशी अपेक्षा आहे.

चिन्हाची फार चिंता करायची नाही, आजपर्यंत मी 14 वेळा निवडणुका लढलो. (I fight 14 times in election) त्यापैकी पाच निवडणुकांचे चिन्ह हे बैलजोडी, गाय वासरू, चरखा, हाताचा पंजा व घड्याळ अशी होती. मात्र चिन्ह काढून घेतलं म्हणजे त्या संघटनेचा अस्तित्व संपेल, असे कधी घडत नाही. (Removal of the symbol does not mean a lot)

मी SHARAD PAWAR साहेबांचाही चेला

महाराष्ट्र पिंजून काढणार

सामान्य माणसाशी संपर्क कायम वाढला पाहिजे, त्याला पण नव्याने काय देऊ शकतो यावर विचार केला पाहिजे, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे नव्याने वाटचाल करताना देखील फार अडचणी येणार नाहीत, असा विश्वास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या समोर बोलून दाखवला. (Sharad Pawar In front of workers) आपण नव्या उमेदीने महाराष्ट्रात फिरून लोकांशी संपर्क साधून लोकांना भूमिका पटवून देणार आहोत, त्यामध्ये पक्ष व चिन्ह याची फारशी अडचण येणार नाही, असा विश्वासच शरद पवार यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

Latest Posts

Don't Miss