Saturday, January 11, 2025

Latest Posts

असं आहे शरद पवारांच्या पक्षाचं नवं चिन्ह : उद्या रायगडावर लॉन्चिंग

| TOR News Network | Sharad Pawar New Party Symbol : उद्या शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हाच्या लॉन्चिंगसाठी रायगडवर खास सोहळा आयोजित करण्यात आला आहे.शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव मिळाले. (Ncp New Symbol Launching At Raigad) आता त्यांना निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हही दिले आहे. या नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी शरद पवार गटाकडून खास सोहळा आयोजित करण्यात आला असून रायगडावरुन शरद पवार गट लोकसभा निवडणुकांची तुतारी फुंकणार आहे. (Tutari New Ncp Party Symbol)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (NCP SharadPawar) गटाकडून नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी उद्या खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचे लॉन्चिंग करत लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्यात येणार आहे. (Ncp New Party Symbol)

उद्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी (New Party Symbol) या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवारांना धक्का: सख्खा पुतण्याची राजकारणात एन्ट्री

नव्या चिन्हाबद्दल काय म्हणाले पवार

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!

Latest Posts

Don't Miss