Saturday, January 11, 2025

Latest Posts

मोदींनी राज ठाकरेंना कोणती फाईल दाखवली – राऊत

| TOR News Network | Sanjay Raut On Raj Thackeray : काल शिवाजी पार्कवर पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. (Raj Thackeray Support Modi) त्यानंतर आज पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी, राज ठाकरेंना कोणती फाईल दाखवली, असा सवाल केला आहे. (Which file modi showed to Raj Thackeray)

मनसेचा काल शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मनसे सैनिकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा देत असल्याचं जाहिरपणे सांगितलं. त्यावरून आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्यावरून टीकेची झोड उठवली आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची गेल्या काही दिवसापासून जी लूट सुरू आहे, जे खोक्याचे घाणेरडे राजकारण सुरू (Sanjay Raut Press Conference) आहे. त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देतोय. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल.

तुमच्या पक्षाचा नमो निर्माण पक्ष का झाला हे त्यांनी सांगावं? (Namo Nirman Paksh) असंही राऊत म्हणाले आहेत. आम्ही महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी मोदी आणि शहा यांच्याशी लढतो आहोत.भाजपने जेव्हा खरे दात दाखवायला (Sanjay Raut On BJP) सुरुवात केली, तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो. आम्ही स्वतंत्र राहिलो आजही आमची भूमिका महाराष्ट्र संदर्भात स्पष्ट आहे. जर कोणी महाराष्ट्रावर घाव घालत असेल स्वाभिमानाला ठेच पोहोचत असेल तर आम्ही एकत्र येऊ असंही वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.

राजकीय विचार कशाला म्हणतात, ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या चिंतनातून समजून घेतलं पाहिजे. ते प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू (Sanjay Raut On Raj Thackeray) आहेत. राजकारणातून ओवाळून टाकलेले नेते आणि व्यभीचारी यांना भाजपाने घेतले आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ अशी अनेक नावं आहेत, ज्यांनी बिनशर्त भाजपसोबत जायचं मान्य केलं. ते का गेले, कोणाच्या दबावामुळे गेले हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या अनेक फायली उघडल्या गेल्या, त्यांना धमक्या दिल्या गेल्यामुळे त्यांनी शरणागती पत्करली.

Latest Posts

Don't Miss