Monday, November 18, 2024

Latest Posts

वंचितची महाविकासआघाडीत प्रवेशाची शक्यता मावळली

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

| TOR News Network | Sanjay Raut On Vanchit Entry : लोकसभा निवडणूकींच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात महायुतीच्या काही जागांसाठी उमेदवार देखाल ठरले आहेत.तर दुसरीकडे वंचित आणि आघाडीत अलबेल असे चित्र आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. मात्र ठोस निर्णय होताना दिसत नाही.त्यामुळे आता वंचित मविआमध्ये येण्याची शक्यता मावळली आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे.(Sanjay raut straight statement on vanchit aghadi)

त्यांची वेगळी भूमिका  दिसत आहे

बाळासाहेब आंबेडकर हे सन्मान नेते आहे. त्यांची अनेक वेळा आमची चर्चा झाली. त्यांनी चार जागेवरती लढावं, त्यांना आम्ही सूचना केले आहेत. हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे. तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता, असं संजय राऊत म्हणाले.

दलित समाज लढ्यात असायलाच पाहिजे

देशात सध्या सुरू असलेल्या हुकूमशाहीच्या लढायला संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे गती आणि बळ आम्हाला नक्कीच मिळाल असतं. आम्हाला अजून देखील खात्री आहे सर्व प्रमुख नेते एकत्र बसतील आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. तुमच्या मनात काही नाराजी असेल ती दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल. वंचित दलित समाज या लढ्यात असायलाच पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss