Saturday, January 11, 2025

Latest Posts

संजय राऊत म्हणाले मोदींनी काँग्रेसची चौकशी करावी 

Theonlinereporter.com – May 9, 2024 

Sanjay Raut Latest Statement : अहमदनगरमध्ये खासदार संजय राऊत यांनी भाजपसह मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. (Sanjay Raut Slams Bjp And Cm Shinde) देशात मोदी हे प्रचाराच्या नावाखाली धुडगूस घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही.(Modi did not Kept dignity of his post)  त्यांची गाडी रूळावरून घसरलेली आहे. मोदींनी एकाही सभेत काम केल्याचा आढावा दिला नाही. काळा पैसा नष्ट करणाची वल्गना करणारे मोदी काळा पैसा काँग्रेसला दिला अस सांगतात.पण त्याची चौकशी करत नाही. मोदींनी ज्यांच्यावर याप्रकरणी आरोप केलेत, त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. (Sanjay Raut Ask inquiry of congress)

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ४ जूनपर्यंत शिंदे यांना काय तांडव करायचा आहे ते करू देत. शिंदेंनी भ्रष्टाचारावर बोलावे, स्वतःच्या भ्रष्टाचारामुळे ते गळपटले होते. आता ४ जूननंतर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील, असा दावा राऊतांनी केला आहे.(Shinde will be in jail after 4 june)

देशातील अनेक छोटे-मोठे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना कधीच विसर्जीत होणार नाही,(Sanjay raut on party merge) किंवा विलनीकरण होणार नाही. आम्ही आमचा पक्ष आनेक संकटात टिकवून ठेवला, बाळासाहेब ठाकरे असतानाही अनेक नेते सोडून गेले. जुने जातात नवे येतात. आमच्याकडे आत्मविश्वास आहे, लोकांचा विश्वास आहे, आमच्याकडे पक्ष नेतृत्व आहे, असे राऊत म्हणाले.(Sanjay raut on party leadership)

अजित पवारांना खोटे बोलण्याची सवयच लागली आहे, असा घणाघात राऊतांनी घातली. ते भाजप सोबत गेले आहेत. भाजप मध्ये खोटे कोण बोलू शकते हे एकमेव क्वालीफिकेशन लागते. सांगलीमध्ये चंद्रहार पाटील निवडूण येणार आहेत.(Sanjay raut on chandrahar patil) सांगलीमध्ये कोण काय केले आहे याचा रिपोर्ट ठाकरेंकडे आला आहे. शिवसेना कोणताही काम अर्धवट सोडत नाही.

Latest Posts

Don't Miss