Saturday, January 18, 2025

Latest Posts

छेss निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..!! तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा…? दया कुछ तो गडबड है

| TOR News Network |

Rupali Patil Thombare Latest News :   पुण्यातील अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यामध्ये राजकीय चढाओढ सुरु आहे.( mahila aayog adhyaksha) एकाच महिला नेत्याला किती जबाबदारी देणार आणि किती संधी देणार असा सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे. (Rupali patil on rupali chakankar) त्यावरुनच त्यांनी एक फेसबुक पोस्च केली असून त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

रुपाली चाकणकर यांना काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. यामुळे रुपाली पाटील ठोंबरे या नाराज झाल्या. रुपाली चाकणकर यांना पक्षातूनच विरोध होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. (rupali chakankar latest News ) एक व्यक्ती एक पद नियमानुसार रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घ्या, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी मला मी बाहेरची असल्याचे म्हटले. त्याने मला हर्ट झालं आहे. मी जर बाहरेची असेल तर मी बाहेरच जाते. मात्र दादा मला बोलले की मी तुम्हाला पक्षप्रवेश दिला आहे त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले होते.(rupali patil on ajit dada pawar)

यानंतर आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. (rupali patil FB post goes viral) या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी अप्रत्यक्षरित्या रुपाली चाकणकरांना टोला लगावला आहे. तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा…? दया_कुछ_तो_गडबड_है अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.

बाई काय हा प्रकार… किती वेळा तेच ते.. “रात्रीस खेळ चाले” ची एवढी बजबजपुरी झाल्यानंतर झाल्यानंतर मालिका बंद होईल असं वाटलं होतं… पण छेss निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..!! तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा…? #दया_कुछ_तो_गडबड_है #दालमें_कुछ_काला_नही_पुरी_दालही_काली_है_भाई, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे. मात्र त्यांनी नक्की हा टोला कोणाला लगावला, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Latest Posts

Don't Miss