Monday, November 18, 2024

Latest Posts

आपण दररोज किती पाणी प्यायला हवे माहित आहे का ?

चांगल्या आरोग्यासाठी (good health) खूप महत्वाचे आहे. एखाद्या माणसाने दिवसभरात नक्की किती पाणी (water) प्यावे ? असा प्रश्न आपल्याला बराच वेळा पडला असेल. एखाद्याने किती पाणी प्यावे हे त्या व्यक्तीची दिवसभरात किती हालचाल (physical activity) होते, त्यावर अवलंबून असते. आपण दररोज किती पाणी प्यायला हवे या बद्दल जाणून घेऊया.How Much Water We Should Drink Daily

आपल्याला तहान का लागते हे बऱ्याच लोकांना कळत नाही. तहान लागण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरात खनिजांची (Minerals) कमतरता निर्माण होते. पाणी आपल्या शरीरात वाहकाचे कार्य करते, जे मिनरल्स व व्हिटॅमिन्स (शरीरात) योग्य ठिकाणी घेऊन जाते. आपल्या शरीरात विविध प्रक्रिया (Reactions) सतत चालू असल्याने मिनरल्सची गरज भासते आणि ही खनिजे आपल्याला पाण्याद्वारे पुरवली जातात.मानवाच्या शरीराचा 70% भाग हा पाण्याने बनलेला असतो. आपल्या शरीरातील प्रत्येक यंत्रणेचे कार्य सुरळीतपणे चालू रहावे यासाठी पाण्याची गरज असते. आपण दिवसभरात किती पाणी प्यावे हे आपले वय, दिवसभरात किती हालचाल होते आणि इतर घटकांवर अवलंबून असते. उदा- एखादा खेळ खेळणाऱ्या किंवा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त पाण्याची आवश्यकता असते. तसेच गर्भवती महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनीही अधिक पाणी पिणे गरजेचे असते.पुरुषांनी दररोज किमान 13 ग्लास पाणी प्यावे तर स्त्रियांनी कमीत कमी 9 ग्लास पाणी प्यावे, अशी माहिती काही अभ्यासातून समोर आली आहे. आपण कुठे काम करतो, तेथील वातावरण कसे आहे, यावरही आपण किती पाणी प्यायले पाहिजे याचे उत्तर अवलंबून असते.

Latest Posts

Don't Miss