Sunday, January 12, 2025

Latest Posts

अखेर मंत्रिपदाबाबत रोहित पवारांना बोलून दाखवली इच्छा

| TOR News Network |

Rohit Pawar Latest News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.(mahavikas Aghadi Confidence increased) विधानसभा निवडणुकीत राज्यात मविआचीची सत्ता येईल, असा विश्वास या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. (Mahavikas Aghadi to come in power) अशातच कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील लोकार्पण सोहळ्यात केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.(Rohit Pawar Statement goes viral)

राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर रोहित पवार हे भलतेच आक्रमक झाले आहे. सध्या ते त्यांचा मतदार संघ पिंजून काढत आहेत. मतदार संघात घेतलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी जोरदार बॅटींग केली. एमआयडीसीच्या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात शरद पवा, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली 3 महिन्यांनंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. (Rohit Pawar On Mahavikas Aghadi Govt) त्यामुळे आपल्या एमआयडीसीच्या पेपरवर जर आताचे मंत्री सही करणार नसतील तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पवारसाहेबांच्या आशीर्वादाने आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याची सही एमआयडीसीच्या कागदावर असू शकते, असं म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या आपली मंत्रि‍पदाची इच्छा बोलून दाखवली. (Rohit Pawar On Ministery)

कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आला होता. यावेळी अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला.(Newly elected MP felicitation in Karjat Jamkhed) या कार्यक्रमाला नारायण आबा पाटील, साहेबराव नाना दरेकर यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

रोहित पवारांनी एकीकडे मंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली असताना दुसरीकडे त्यांनी महाविकास आघाडी किती जागा जिंकेल याचे भाकीतही व्यक्त केले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 180 आमदार हे महाविकास आघाडीचे असतील असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.(Rohit Pawar On Vidhansabha wining Seats) या आधी शरद पवारांनीही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणे शक्य आहे असे म्हटले होते. तर उद्धव ठाकरे यांनीही काही झाले तर या पुढचे सरकार हे महाविकास आघाडीचे असेल असे सांगितले होते.

Latest Posts

Don't Miss