Saturday, January 11, 2025

Latest Posts

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या आश्रमाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

Rashtrasant Tukadoji Maharaj Aashram News : अमरावती येथील गुरूकुंज आश्रम जगाच्या कानाकोपऱ्यातील गुरूदेव भक्तांसाठी महत्त्वाचे स्थान आहे. थोर विभूती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची येथे समाधी आहे. राष्ट्रसंतांनी राष्ट्रभक्ती, जागृती, अंधश्रद्धा-जातीभेद निर्मूलन, ग्रामविकास यासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्याद्वारे लिखित ग्रामगिता अनेकांना जीवन कसे जगावे यासाठी प्रेरणा देते.
लाखो गुरुदेव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.  मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.
ग्रामविकास विभागाने २८ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महासमाधी स्थळ श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला आहे.

Latest Posts

Don't Miss