Saturday, January 11, 2025

Latest Posts

उमेदवार जाहीर होत नाही यातच आमचा विजय

| TOR News Network | Ratnagiri Sindhudurg Constituency : लोकसभा निवडणुकीत नारायण राणे किंवा त्यांचे पुत्र असू दे अथवा शिंदे गटाचे उमेदवार असू दे विजया आमचाच आहे असेही राजन साळवींनी यापूर्वी देखील नमूद केले होते.रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात विरोधकांना अद्याप उमेदवार जाहीर करता आलेला नाही. ही गोष्ट दु्र्देवी असून समोरचा उमेदवार कोणीही असो आत्ताच आमचा महाविकास आघाडीचा विजय झाल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार राजन साळवी यांनी नमूद केले. (Mahavikas Aghadi will win ratnagari sindhudurg)

आमदार साळवी म्हणाले रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. (Mla Rajan salvi on mahayuti) या निवडणुकीची घोषणा होऊन सुद्धा समोरच्यांचा उमेदवार जाहीर झालेला नाही ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल.

हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्लाच राहणार. खासदार विनायक हे विजयाची हॅट्रिक करणार. (Hat-trick win for vinayak raut)आमचा उमेदवार अडीच तीन लाखाच्या फरकाने निवडून येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही राजन साळवी यांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे (narayan rane) आव्हान आम्हांला कोकणामध्ये (konkan politics) अजिबात वाटत नाही. या मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेच वर्चस्व आहे आणि राहणार असा विश्वास साळवींनी व्यक्त केला.

Latest Posts

Don't Miss