Saturday, January 11, 2025

Latest Posts

राज ठाकरे अन् फडणवीस यांच्यात मध्यरात्री अज्ञात स्थळी भेट

| TOR News Network | Raj Thackeray Devendra Fadnavis Latest News : काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री ११ वाजताच्या जवळपास दिल्ली येथून मुंबईला परतले.त्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ सोडले. दोन्ही नेते मुंबई विमानतळ ते लोअर परले दरम्यान अज्ञात स्थळी भेटले.त्यांच्यात जवळपास ३० ते ४५ मिनिटे चर्चा झाली. (Devendra Fadnavis Raj Thackeray midnight meet)

 गेल्या दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर महायुतीत मनसे येणार असल्याची चर्चा सुरु झाली. मनसेला दोन किंवा तीन जागा मिळण्याबाबत चर्चा सुरु आहे. (MNS to get 2 or 3 seats in loksabha) या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. ही भेट अज्ञातस्थळी झाली. सुमारे ३० ते ४५ मिनिटे दोन्ही नेते एकत्र होते. यामुळे या प्रकारबद्दल उत्सुक्ता वाढली आहे.

मध्यरात्री झालेल्या बैठकीची जोरदार चर्चा

अमित शाह यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीवरुन मुंबईत येण्यासाठी निघाले. सुमारे बुधवारी रात्री ११.१५ वाजता देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्याचवेळी राज ठाकरे शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानावरुन बाहेर पडले. दोन्ही नेते मुंबई विमानतळ ते लोअर परले दरम्यान अज्ञात स्थळी भेटले. (Fadnavis raj Thackeray meeting location undisclosed) रात्री ११.३० ते १२.१५ दरम्यान अर्धा ते पाऊन तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. (Discussion between the two leaders for half an hour) त्यानंतर १२.३० वाजता राज ठाकरे पुन्हा शिवतीर्थावर परतले. मध्यरात्री झालेल्या या बैठकीची जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे.

राज ठाकरेंची लोकसभेसाठी जोरदार तयारीत

मनसे नेते राज ठाकरे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत उमेदवार दिला नव्हता. परंतु यंदा गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे लोकसभेसाठी जोरदार तयारी करत आहेत. आता अमित शाह यांच्या भेटीनंतर त्यांनी पक्षातील लोकांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत भाजपसोबत युती करण्याबाबत चर्चा होणार आहे. (Mns Discussion about alliance with BJP in meeting) यामुळे महायुतीत मनसे येण्याचा निर्णय एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.

मनसेला कोणत्या जागा मिळणार

मनसेला लोकसभेचा कोणत्या जागा मिळणार? याकडे मनसे सैनिकांचे लक्ष लागेल आहे. लोकसभेच्या १३ मतदार संघात मनसेचे अस्तित्व आहे. यामुळे महायुतीत मनसे आल्यानंतर या ठिकाणी फायदा होणार आहे. मनसेला मुंबई, शिर्डी किंवा नाशिकमधील एक लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss