Tuesday, November 19, 2024

Latest Posts

आयपीएल मध्ये सूर्यकुमार यादवच्या खेळण्यावर सस्पेन्स कायम

| TOR News Network | Suryakumar Yadav Ipl Latest News : भारताचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादव यंदाच्या आसपीएल खेळणार का या संदर्भात अजून स्पष्टता आलेली नाही.सूर्यकुमार यादव सध्या सराव करत आहेत.त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केली आहे.त्यात तो आपल्या सहकारी खेळाडूंचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यंदा त्याच्या आयपीएल मधील सुरुवातीच्या सहभागावर सस्पेन्सची टांगती तलवार दिसून येत आहे. त्याला अद्याप एनसीएकडून फिटनेसचे प्रमाणपत्र मिळालेले नाही.(No Fitness Certificate to Suryakumar Yadav from NCA)

यादव हे सामने खेळू शकणार नाही

आयपीएल 2024 22 मार्चपासून सुरू होत आहे. पण मुंबई इंडियन्स रविवार, 24 मार्चपासून गुजरात टायटन्सविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पण, जगातील नंबर वन फलंदाज टी-20 लीग मध्ये खेळणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला, तर सूर्यकुमार यादव हे सामने खेळू शकणार नाही. एवढेच नाही तर यानंतरचा पुढील सामनाही तो खेळू शकणार नाही. कारण, पहिल्या दोन सामन्यांसाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल की नाही हे सांगणे कठीण आहे. (Suryakumar will be drop from Ipl 2024)सूर्यकुमार यादव सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन करत आहे. स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर त्याचे पुनर्वसन चांगले चालले आहे, (Suryakumar yadav Operation) जे पाहता तो आयपीएल 2024 च्या पहिल्याच सामन्यापासून खेळण्यास तयार असल्याचे दिसते. पण, बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने जे लिहिले आहे, ते संशयास्पद आहे.

फिटनेसबाबत काहीही सांगितलेले नाही

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीएच्या स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिकल टीमने अद्याप सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबाबत निश्चितपणे काहीही सांगितलेले नाही. विशेषत: IPL 2024 मधील मुंबई इंडियन्सच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी नाही, जो 27 मार्च रोजी गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहेत. आता एनसीए त्याच्या फिटनेसची पुष्टी करेपर्यंत सूर्यकुमार कसा खेळणार? (Question About suryakumar Yadav Playing Ipl 2024)

171 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट

तथापि, सूत्रांनी असेही सांगितले की आयपीएल 2024 सुरू होण्यास अजून काही दिवस आहेत. मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव आपला फिटनेस सिद्ध करेल अशी अपेक्षा आहे. सूर्यकुमार यादवने टी-20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी मोठे योगदान दिले आहे. आतापर्यंत खेळलेल्या 60 T20 सामन्यांमध्ये त्याने 4 शतकांसह 171 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 2141 धावा केल्या आहेत. या आकडेवारीसह, तो यावर्षी आयपीएलनंतर होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी महत्त्वाचा दुवा आहे. सूर्यकुमार यादवने शेवटचा टी20 सामना दक्षिण आफ्रिकेत खेळला.

Latest Posts

Don't Miss