Monday, November 18, 2024

Latest Posts

पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती अंतर्गत उपक्रम

ममता हेल्थ इंस्टिट्यूट फॉर मदर एंड चाइल्ड प्रोजेक्टचा उपक्रम

| TOR News Network | Environmental Protection Campaign Under Mamta Health Institute for Mother and Child : ममता हेल्थ इंस्टिट्यूट फॉर मदर एंड चाइल्ड प्रोजेक्ट जागृती अंतर्गत पर्यावरण संरक्षण अभियान (PARI 2.0) राबवण्यात आले. (Mamta Health Institute for mother and child)नेहरू नगर झोन, गांधीबाग झोन, कामठी झोन, लक्ष्मीनगर झोन येथील तब्बल 80 गावांमध्ये, गल्ली- मोहल्ल्यात फिरून नाटकाद्वारे 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जनजागृती करण्यात आली. (Environment Public awareness)

वायु प्रदुषण जसे की अगरबत्ती, कापुर, चुलीच्या धुरंमुळे होणारे श्वास संबंधित रोग वाढत आहेत. पर्यावरण दुषीत होत असल्यामुळे टाइफाइड, मलेरिया, यासारखे रोग वाढत आहेत. तसेच सिंगल वापर प्लास्टिक मुळे प्रदूषण वाढत असल्याने पर्यावरण प्रदुषण होत आहे. मुक्या जनावरांचा मृत्यु होत आहे. जमीन नापिकी होत आहे. नदी व नाल्यांमध्ये घान तसेच चोक होणे हे प्रकार वाढत आहे. प्लास्टिक जाळल्याने विषारी धुर हवेमध्ये पसरत आहे. ज्यामुळे कॅंसर व विविध रोग होत आहे. ओला कचरा व सूखा कचरा कोणत्या डस्टबिन मध्ये ठेवायचा व त्याचे फायदे प्लास्टिक एकत्रित करुण त्याला पण कचरा गाडित टाकने गरजेचे आहे. हे केल्यास प्रदुषण कमी होण्यासाठी मदत होईल.या नुक्कड़ नाटकाद्वारे अनेक उपाय योजना  सांगण्यात आल्या. या कार्यक्रमला जनतेने चांगला प्रतिसाद दिला व मोठ्या संख्यने लोकं उपस्थित होते. जनता सांगितलेल्या गोष्टीचा  अवलंब करतील व पर्यावरण स्वच्छ ठेवायला ते आजपासूनच सुरुवात करतील. ज्या मुळे त्यांचे आणि त्यांचा परिवारजनांचा बचाव होणार. या करीता त्यांनी ममता संस्थाचे आभार मानले. ममता संस्था प्रोजेक्ट जागृती अंतर्गत पर्यावरण संरक्षण उपक्रम नुक्कड़ नाटकाद्वारे राबाविल्याचे सगळ्यांनी कौतुक केले. व असे उपक्रम राबविल्याने जनतेला हा विषय चांगल्या पद्धतीने समजला. या कार्यक्रमला यशस्वी करण्यासाठी दिल्ली येथून आलेली नुक्कड़ नाटक टीम व ममता हेल्थ इंस्टिट्यूट प्रोजेक्ट जागृतीचे आउट रीच वर्कर, ब्लॉक सुपरवाइजर व राज्य समन्वयक पल्लवी भांडारकार यांनी पूर्ण प्रयत्न केले व कार्यक्रमला यशस्वी केले.

Latest Posts

Don't Miss