Accident on Samruddhi Mahamarg Today : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक होऊन भीषण अपघात झाला.या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. (Three died in accident on samruddhi)अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वाढोना शिवणी दरम्यान चॅनल १२८ वर गुरुवारला (ता.२५) सकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. (Accident At Amravati wadhona shivni)
मिळालेल्या माहिती नुसार असे की,अहमदनगरहून रायपूरकडे जाणारी खासगी ट्रॅव्हलस क्रमांक सी.जी.१९-एफ ०३८१ हीची बाजूच्या कंटेनरला पाठीमागून धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. यात ट्रॅव्हलस मधील ३ व्यक्तींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यात रिशी गोड (२०) रा. लितीपुर ता.नवागड जि. बेमित्रा ,छत्तीसगड, डगेश्वर गोड ( २२) रा. पदमी ता. जि. बेमित्रा ,छत्तीसगड व प्रकाश (ट्रॅव्हल्सचा हेल्पर) यांचा समावेश आहे. (private bus accident at amravati)यांचे मृतदेह धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आले आहे.
ट्रॅव्हल्सचा चालक फरार झाला आहे. घटनास्थळी तळेगांव दशासर व नांदगांव खंडेश्वर पोलीस तातडीने दाखल झाले होते.त्यांनी वाहतूक सुरळीत केली.तळेगाव दशासरचे ठाणेदार रामेश्वर घोंडगे यांनी घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला.अधिक तपास तळेगाव दशासर पोलीस करीत आहे.
समृद्धी महामार्गावर आतापर्यंत झालेले अपघात हे रात्री व पहाटेच्या दरम्यान झालेले आहेत. अनेकदा या वेळेत चालकाला डुलकी येते. त्यात ठरवून दिलेल्या मर्यादापेक्षा वाहनांचा वेग असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे होणारे अपघात हे अत्यंत भीषण असतात. समृद्धी महामार्गावर एवढ्या वेगाने जी वाहने चालवली जातात ती देखील या वेगासाठी योग्य नसतात, असेही स्पष्ट झाले आहे.
सात महिन्यांपूर्वी झाला होता भीषण अपघात
नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसला आग लागल्याची घटना १ जुलै २०२३ रोजी घडली होती. समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता, पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावरून जात असताना बस दुभाजकाला धडकली, त्यानंतर बसने पेट घेतला. बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. बस पलटी झाल्याने बसचा दरवाजा हा खालच्या भाग बाजूला आला त्यामुळे प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांना बाहेर पडता न आल्याने २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.