राजकीय क्षेत्रात दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Prithviraj Chavan & Sanjay Raut On MLA Disqualification : राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर राजकीय भूकंप होईल असं म्हणटलं आहे.तर खासदार संजय राऊत यांनी आमदारांच्या बाबतच्या निकालाचं मॅचफिक्सिंग आधीच झालं आहे असे मत नोंदवले आहे. (Sanjay rauts Says Its Match Fixing) विरोधकांच्या अशा वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
चव्हाण म्हणाले पक्षांतर कायदा बदलायला हवा आणि याचे राजकीय परिणाम वाईट आहेत. 16 आमदार जर अपात्र झाले. शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांचं पद गेलं तर राजकीय भूकंप होईल.(Congress Leader Prithviraj Chavan On Mla Disqualification) घटनात्मक तरतूद काय आहे हे पाहायला हवं. आजचा निकाल हा अतिशय महत्त्वाचा राजकीय निर्णय असेल.16 आमदारांना रद्द केलं पाहिजे ही कायदेशीर बाब झाली. पण विधानसभा अध्यक्ष कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी असतात आणि ते त्या पक्षाचे हित बघणार नाहीत, असं होणार नाही. या निकालाला दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला. आज 4 वाजता काय निर्णय होईल हे पाहावं लागेल, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलेले. मी कधी याआधी पाहायला मिळालं नव्हतं.(Prithviraj Chavan says Political Earthquake will happen) चुकीचा पायंडा पाडला गेला आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा केला आहे. आमदार अपात्रतेच्या निकालात मॅच फिक्सिंग झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आमदारांच्या बाबतच्या निकालाचं मॅचफिक्सिंग आधीच झालं आहे. (Sanjay Rauts says its a match fixing) विधानसभा अध्यक्ष आज फक्त औपचारिकता म्हणून निकाल देणार आहेत, असं दावा संजय राऊत यांनी केला आहे.आमदार अपात्रतेबाबत निर्णय दिल्लीतूनच आलेला आहे. आता फक्त शिक्का मारणं बाकी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला जाणार आहेत. कोणत्या खात्रीवर त्यांनी निर्णय घेतला आहे. याचा अर्थ तुमची मॅच फिक्सिंग झालेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रोडशोसाठी दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री दावोसला जात आहेत. कारण त्यांना निर्णय माहिती आहे, (Eknath Shinde Know The Result Says Raut) असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
समान बातमी : आमदार अपात्रत प्रकरण