Saturday, January 18, 2025

Latest Posts

तो लिपस्टीक, पावडर लावून टीव्हीवर काहीही बोलतो

प्रसाद लाड यांचा संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल

| TOR News Network | Prasad Lad Statement On Sanjay Raut: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अत्यंत बेताल वक्तव्यं करीत आहेत. गेले काही दिवस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांवर आपले टीकास्त्र उपसले आहे. त्यामुळे भाजप नेतेही त्यांच्यावर जोरदार पलटवार करत आहेत. भाजपचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी राऊतांचा उल्लेख ‘नटरंगी नाचा’ असा करत जोरदार हल्लाबोल केला. (Sanjay raut is Natrangi nachya)

आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांची तुलना विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरशी (Pm Modi comparison with johnny lever) केली. राऊतांच्या या टीकेवर भाजपने आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

प्रसाद लाड म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशातील १३० कोटी जनतेचा स्वाभिमान आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हीन भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊत नावाचा नाच्याला हे माहीत नाही. सकाळी उठून लिपस्टीक, पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही बोललं जातं, देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला जातो, असं प्रसाद लाड म्हणाले. तसंच संजय राऊत यांना उद्देशून ‘अरे नटरंगी नाच्या महाराष्ट्र, देशातील जनता तुला चपलेने मारल्याशिवाय, तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प राहणार नाही,’ असं प्रसाद लाड म्हणाले.(Prasad lad slams sanjay raut)

Latest Posts

Don't Miss