Monday, November 18, 2024

Latest Posts

अर्ध्याहून अधिक ठिकाणी काँग्रेसचे डिपॉझिट जप्त होईल

वंचितचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विघान

Prakash Ambedkar on Congress : वंचित बहुजन आघाडी गेल्या एक वर्षांपासून महाविकास आघाडीत घरोबा करण्याच्या तयारीत होती. त्यादृष्टीने अनेकदा हालचाली झाल्या. पण त्याला काही यश आले नाही. उद्धव ठाकरे गटाने वंचितला जवळ केले, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ताकास तूरी लागू दिली नाही. गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक झाली, त्यात वंचितविषयी सकारात्मक सूर आळवल्या गेला. तर आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचितला रीतसर निमंत्रण धाडण्यात आले.(Vanchit Aghadi Meeting) पण त्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विघान केले आहे.(Ambedkar Statement on Aghadi)

मुस्लिम मतदारांनी काँग्रेस सोबत जाऊ नये

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त होईल.राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. मात्र यांच्यात जागा वाटपा वरून अद्याप एकमत होताना दिसत नाही’, असा घरचा आहेरच बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला. “आपल्याला काँग्रेस ने हे दिलं ते दिलं म्हणून मुस्लिम मतदारांनी आता काँग्रेस सोबत जाऊ नये.(Muslims Should reject Congress) वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात मुस्लिम संवाद सभे मध्ये बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

तर अवस्था इंडिया आघाडीसारखीच

जर येत्या 15 दिवसात यांनी जागा वाटपाचा निर्णय घेतला तर हे वाचतील. नाही तर यांचे ही हाल इंडिया आघाडीसारखे होतील असे वक्तव्य आंबेडकर यांनी केलं. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इंडीया आघाडी तयार झाली होती. मात्र ती जेव्हा बनली तेव्हाच हे निश्चित होतं की ही तुटणार आहे, कारण याचा रिंग मास्टर पंतप्रधान नरेंद मोदी होते, असा आरोप बाळासाहेब आंबेडकर यांनी केला. (Balasaheb Ambedkar On India Aghadi)

काँग्रेसने दिले निमंत्रण

महाविकास आघाडीत समावेश होण्यासाठी वंचितचे प्रयत्न आता फळाले आहे. उद्धव ठाकरे गटासोबत त्यांचा सलोखा अगोदरच झाला. आज 30 जानेवारी रोजी महाविकास आघाडीची बैठक होत आहे. (Today Mahavikhas aghadi Meeting) काँग्रेसने वंचितला या बैठकीसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. (Aghadi Vanchit Meeting) त्यामुळे त्यापूर्वीच आंबेडकर यांच्या बॉम्बने खळबळ उडाली आहे. हा दबावतंत्राचा भाग तर नाही ना, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.

Latest Posts

Don't Miss