Saturday, January 11, 2025

Latest Posts

India Vs South Africa: टेबल टॉपसाठी भारत द.अफ्रिकेत चुरस

India Vs South Africa:यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत गुण तालिकेत आग्रस्थान प्राप्त केला आहे. तर द.अफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. रविवारी कोलकाता येथील इडन गार्डनवर होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ आग्रस्थान मिळवण्यासाठी भिडणार आहेत. (India South Africa World Cup Match Preview) श्रीलंकेचा दारुन पराभव केल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला  आहे. तर इडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने सामन्यात मोठी फटकेबाजी बघायला मिळणार आहे. (India South Africa Head to Head For Top Table)

विश्वचषकात भारत आणि द.अफ्रिका या दोन्ही संघाकडे विजयाचे प्रबळ दावेदार म्हणून बघितल्या जात आहे.भारताने प्रत्येक सामन्यात आपल्यातील गुणवत्त सिध्द करत अग्रस्थान गाठले आहे. फलंदाजीत विराट कोहली,रोहित शर्मा,शुभमन गिल,के.एल.राहुल यांनी आपली भूमिका चोखपणे बजावली आहे. श्रीलंकेसोबत झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यरने मोठी फटकेबाजी करत आपण फाॅर्मात आल्याचे दाखवून दिले आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला केवळ ५५ धांवांवर रोखल्याने फलंदाजी सोबतच गोलंदाजीत देखील भारत मागे नाही हे दिसून आले आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक ४० बळी घेणारा मोहम्मद शमी चांगल्या फाॅर्मात आहे.तर दुसरीकडे ओपनिंग गोलंदाज जसप्रित बुमराहची आक्रमक शैलीचा भारताला फायदा झाला आहे. मोहम्मद सिराजनेही आपला लय कायम राखत प्रतिस्पर्धी संघाच्या दांड्या उडवल्या आहेत. एकंदरीतच भारतीय संघ सर्वच आघाडीत परिपूर्ण असल्याचे आतापर्यंतच्या केलेल्या कामगिरीतून दिसून आला आहे.तर दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेला खेळलेल्या सात सामन्या पैकी एका सामन्यात पराभवाला समोर जावे लागले आहे. नेदरलंड सारख्या कमी अनुभव आसलेल्या संघाने अफ्रिकेला पराभूत केले आहे. त्यामुळे भारता विरुध्दच्या सामन्यात झालेल्या सर्व चूका टाळण्यावर अफ्रिकेचा भर असणार आहे. कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात अफ्रिका मैदानात भारतावर आक्रमक राहणार असल्याचे संकेत दिले आहे. अफ्रिकेने इडन गार्डनवर कसून सराव केला आहे.फलंदाजी सोबतच गोलंदाजीत ही अफ्रिका तगडा संघ आहे. क्षेत्र रक्षणातही अफ्रिकेचे खेळाडू चपळ आहेत. तर आता पर्यंत झालेल्या एक दिवसीय सामन्यात भारत आणि अफ्रिकेत  एकून ९० सामने झाले असून यात ३७ सामने भारताने जिंकले आहेत. तर अफ्रिकेने ५० सामने जिंकले असून ३ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात भारताला अगदी श्रीलंकेविरुध्द केलेल्या खेळाची पुनरावृत्ती करत मोठी धावसंख्या उभारावी लागाणार आहे. इडन गार्डनच्या खेळपट्टीडे लक्ष दिल्यास ती फलंदाजीसाठी ओळखल्या जाते.त्यामुळे या सामन्यात मोठी फटकेबाजीसह रंगतदेखील पाहायला मिळणार आहे.

हार्दिक पांड्या विश्वचषकाच्या बाहेर

विश्वचषकातील आगामी होणाऱ्या सर्व सामन्यातून भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाहेर झाला आहे. (Hardik Pandya Out From World cup 2023) हार्दिक अध्याप आपल्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याने पुढील सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. १९ आॅक्टोबरला बांगलादेश विरुध्दच्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होता. चेंडू पायाने आडवल्यामुळे हार्दिकचा लिगामेंट ब्रेक झाला होता.सध्या तो बंगरुळू येथे उपचार घेत असून तो अध्याप पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे आगामी सामन्यात हार्दिक संघात दिसणार नसल्याने त्याच्या चाहत्यांसोबतच भारतालाही हा मोठा धक्का असणार आहे.

Latest Posts

Don't Miss