Sunday, January 12, 2025

Latest Posts

चित्र स्पष्ट : रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे राणे विरुध्द विनायक राऊत

| TOR News Network | Ratnagiri Sindhudurg Lok Sabha 2024 : रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चांचं सत्र सुरू होतं. अखेर या जागेचा तिढा सुटला आहे. हा मतदारसंघ भाजपच्या (BJP) पारड्यात पडला आहे. अखेर या जागेवर नारायण राणेंचं नाव जाहीर झालं आहे.(Narayan rane from Ratnagiri Sindhudurg)

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसताना या मतदारसंघात प्रचाराचा धडाका मात्र जोरात सुरू झाला होता. सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडून द्या असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मतदारांना आवाहन केलं होतं.त्यामुळे नारायण राणेंच संभाव्य उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात होती. तशा प्रकारचा प्रचार देखील केला जातं होता. दरम्यान आज भाजपने अधिकृत उमेदवाराची घोषणा केली आहे.(Bjp declared Ratnagiri Sindhudurg Seat) ही जागा भाजपच्या पारड्यात पडली आहे. या जागेवर नारायण राणे अधिकृत उमेदवार जाहीर झाले आहेत.(Narayan Rane to contest from Ratnagiri Sindhudurg)

शिवसेनेने खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Shivsena vinayak raut from Ratnagiri Sindhudurg) तर आज महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. (Narayan Rane vs Vinayak raut) भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या कामाला सुरुवात केली आहे.(In Ratnagiri Sindhudurg Bjp Vs UBT Shivsena) या मतदारसंघात बेरोजगारी, रिफायनरीसह विविध प्रकल्प, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था, महागाई यांसह अनेक मुद्दे प्रचारात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्ताधाऱ्यांवर कोणताही विकास केला नसल्याचा आरोप केला जात आहे. तर ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राऊत हे विकास प्रकल्पांना हेतुपुरस्सर विरोध करीत असल्याची टीका सत्ताधारी करीत आहेत.

रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात २०१९ मध्ये विनायक राऊत आणि डॉ.नीलेश राणे यांच्यामध्ये लढत झाली होती. राऊत यांनी शिवसेना -भाजप युतीकडून लढविली होती तर राणे यांनी स्वाभिमान पक्षातून उभे होते. या लढतीत राऊत यांनी बाजी मारली होती. (in 2029 vinayak raut defeat nilesh rane)

Latest Posts

Don't Miss