Saturday, January 18, 2025

Latest Posts

खोट्या सह्या घेतल्या,आम्हाला शॉक दिला व मारहाण पण केली

संसदेतील सुरक्षा भंग प्रकरणातील आरोपींचा दिल्ली पोलीसांवर गंभीर आरोप

Parliament Security Breach Latest Update : दिल्ली पोलीस आमचा छळ करत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांशी आमचे संबंध नसतानाही आमचे त्यांच्याशी संबंध आहेत असे आमच्याकडून कबूल करण्यास भाग पाडले जात आहे, असे संसदेतील सुरक्षा भंग केलेल्या  ६ आरोपींनी केला आहे.या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. आपली बाजू मांडत त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. (Accused Blame On Delhi Police)

संसदेतील सुरक्षा भंग केल्याप्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. आपली बाजू मांडत असताना यातील ५ आरोपींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्ली पोलीस आमचा छळ करत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांशी आमचे संबंध नसतानाही आमचे त्यांच्याशी संबंध आहेत असे आमच्याकडून कबूल करण्यास भाग पाडले जात आहे, असे आरोप या ५ आरोपींनी पोलीसांवर केलेत.

पाचही आरोपींनी कोर्टात पुढे सांगितले की, आमच्याकडून जळपास ७० कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या आहेत. (Took Signature On Blank Paper) यासाठी आमचा मोठ्याप्रमाणावर छळ करण्यात आला. आम्हाला विजेचा शॉकही देण्यात आला.(Police Gave us Shock) ‘बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा’ (UAPA) अंतर्गत गुन्ह्यांची कबुली देण्यासाठी आणि विरोधी राष्ट्रीय राजकीय पक्षांशी आमचे संबंध आहेत अशी माहिती देण्यासाठी आम्हाला भाग पाडलं गेलं, असं ५ आरोपींनी म्हटलं आहे.

समांतर बातमी : संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

न्यायालयाने या पाचही जणांचे म्हणणे ऐकले असून यावर पोलिसांकडून उत्तर मागवले आहे. तसेच पुढील सुनावणीसाठी १७ फेब्रुबारी ही तारीख दिली आहे.

Latest Posts

Don't Miss