Saturday, January 11, 2025

Latest Posts

आता मोदीचे सरकार राहिलेले नाही आणि मोदी गॅरंटी पण संपली

| TOR News Network |

Sharad Pawar on PM Modi : आज मोदी गॅरंटी राहिलेली नाही,(Now No Modi guarantee) मोदी सरकार पण राहिले नाही. (End Of Modi Sarkar) आता  महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या राज्यत तीन महिन्यांनी निवडणूक आहे. तिथे आपल्याला सरकार आणायचे आहे, जनतेत विश्वास  निर्माण करायचा आहे.  पंतप्रधान एका पक्षाचा नसतो देशाचा असतो, सर्व जाती, धर्म याचा विचार करायला पाहिजे अशी टीका शरद पवार यांनी केली. (Sharad Pawar Slams Modi) ते अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या मेळाव्यात बोलत होते.(Ncp Ahmednagar melava) यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला होता. त्या टीकेला शरद पवारांनी जोरदार उत्तर दिलं आहे. ‘हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही,’ (My wandering soul Will Not Left you)असं पवारांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25 वा वर्धापन दिन होता.(NCP 25th Anniversary) त्यानिमित्तानं पक्षातील दोन गटांचे दोन स्वतंत्र कार्यक्रम झाले. अजित पवार गटाचा मुंबईमध्ये मेळावा झाला.

राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतात पण त्याला मर्यादा हव्या. माझ्याबद्दल ते भटकती आत्मा बोलले. हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. नकली बापाची शिवसेना म्हणायचे हे त्यांना शोभते का? पंतप्रधानांनी हे बोलावं का? असा प्रश्न विचारत त्यांना तारतम्य राहिलं नाही, असं पवारांनी यावेळी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. ‘मी तुम्हाला खात्री देतो आमचे खासदार जनतेसाठी लढतील, (NCP New 8 Mp Will Fight For Common People)असं पवारांनी सांगितलं. हे आठही सदस्य म्हणजे अष्टप्रधान मंडळ असल्याचं पवार यावेळी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पंतप्रधानांनी  कुणाचंही नाव न घेता जोरदार टीका केली आहे.(Modi On Sharad Pawar)’मी जे बोलतोय ते कोणी स्वत:हून आपल्या डोक्यावर घेऊ नये. आमच्याकडे म्हणतात की काही अतृप्त आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही, ज्यांची स्वप्ने अपूर्ण राहतात त्यांचे आत्मे फिरत राहतात. (Modi On wandering soul) स्वत:चं काम नाही झालं तर त्यांना इतरांचे काम बिघडवण्यात त्यांना आनंद मिळतो. महाराष्ट्रही अशा अतृप्त आत्म्यांचा शिकार झाला आहे.

Latest Posts

Don't Miss