Saturday, January 11, 2025

Latest Posts

कोणी चिंता करु नये, आम्हीच सत्तेवर येणार.. या तारखेला मुख्यमंत्री जाहीर करु

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : महाविकास आघाडीचे जागावाटपासंदर्भात 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. इतर लोकांनी याद्या जाहीर केल्या असतील.(Sanjay raut on MVA candidate list) त्यांना विरोधी पक्षात बसायचं आहे. आम्हाला सरकार बनवायचं आहे. आम्ही उद्याचे सत्ताधारी आहोत.(we will be in power) म्हणून प्रत्येक मतदारसंघ तोलून मापून जागावाटप करत आहोत” असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घेऊन तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते घोषणा करतील. (MVA Press Conference today) कोणी चिंता करु नये. 23 तारखेला आम्ही मुख्यमंत्री जाहीर करु.

“शिवसेना या मैदानातली अनुभवी खेळाडू आहे. शिवसेनेला सेंच्युरी मारावी लागेल. लोकांना अपेक्षा आहेत, शिवसेनेने सेंच्युरी मारावी. सेंच्युरी जागा वाटपात नाही, विजयात मारावी अशी अपेक्षा आहे. शिवसेना महाराष्ट्राची स्वाभिमान, अस्मिता जपणार पक्ष आहे” असं संजय राऊत म्हणाले. “आम्हाला सत्ता स्थापन करायची आहे. आज संध्याकाळी याद्या जाहीर होतील.(sanjay raut on MVA candidate list) जागा वाटप पूर्ण होईल. निवडणुका होतील, 23 तारखेला निकाल लागेल, त्यावेळी 10.30 वाजण्याच्या मुहूर्तावर मविआकडून कोण नेतृत्व करणार? ते मी तुम्हाला सांगेन” अशी विजयाची खात्री संजय राऊत यांनी व्यक्त केली.

“उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या नसल्या, तरी एबी फॉर्म गेलेत. याद्या फक्त फॉर्मोलिटी आहे” असं संजय राऊत म्हणाले. कन्फर्म उमेदवारांची नाव जाहीर करायला विलंब का? या पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, “उमेदवार याद्या जाहीर करण्याची शिवसेनेची परंपरा नाही. एबी फॉर्म आम्ही दिलेत. कोणी उमेदवारी अर्ज दाखल केलेत, ते तुम्हाला उद्या सामनामधून कळेल” “बंडखोरीची भिती कशाला बाळगणार? ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या, निवडून आले, मंत्रिपदं दिली, रंकाचे राव केले, ते सत्तेसाठी सोडून गेले” असं संजय राऊत म्हणाले. “इच्छुकांची संख्या सगळ्यात जास्त आमच्याकडे आहे, याचा अर्थ आम्ही सत्तेवर येणार आहोत” असं दावा राऊत यांनी केला.

Latest Posts

Don't Miss