Friday, January 17, 2025

Latest Posts

नितीन राऊत यांच्या कारचा अपघात

| TOR News Network |

Nitin Raut Latest News : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात एकाच दिवशी २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर होईल. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री आणि नागपूर उत्तरचे उमेदवार नितीन राऊत यांच्या कारचा अपघात झाला आहे. (Nitin Raut Car accident) सुदैवाने नितीन राऊतांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

नागपूरमध्ये बुधवारी रात्री हा अपघात झाला. या अपघातामधून काँग्रेसचे नेते नितीन राऊत थोडक्यात बचावले. नितीन राऊत यांच्या वाहनाला बुधवारी रात्री ऑटोमोटीव्ह चौकावर अपघात झाला.(Former minister Raut’s car accident) नितीन राऊत प्रचार संपून त्यांच्या घराकडे जात असताना एका ट्रकने त्यांच्या चारचाकी वाहनाला मागून जोरदार धडक दिली. (truck hit nitin raut car) ही धडक कारच्या दरवाजाजवळ बसली. मात्र सुदैवाने कारचालकाने प्रसंगावधान दाखवत नियंत्रण कायम ठेवल्याने कार पलटली नाही.

कारला अचानक धडक बसल्याने कारमध्ये बसलेले नितीन राऊत आणि इतर सहकाऱ्यांना जोरदार धक्का बसला. मात्र या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. नितीन राऊत हेही या अपघातातून बचावले असून ते सुखरूप आहेत.(nitin raut safe in accident) अपघातानंतर राऊत यांच्या सहकाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणामध्ये अधिक तपास करत आहेत.

Latest Posts

Don't Miss