Saturday, January 11, 2025

Latest Posts

सीतारामन यांनी सांगितला विकसित भारताचा पुढील प्लॅन

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडताना मोदी सरकारने केलेल्या १० वर्षांच्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवला.(Modi Govt Viksit Bharat Plan) आतापर्यंतच्या अर्थसंकल्पातून सरकारने काय-काय कामे कामे केलीत, याची माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी संसदेत दिली. तसेच विकसित भारतासाठी केंद्र सरकारचा पुढचा प्लान काय? याबाबतही सांगितलं. (Nirmala Sitharaman Budget Speech 2024 )

विकसित भारतासाठी केंद्र सरकारला ४ बाबींवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असल्याचं सीतारामन म्हणाल्या. आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा ४ वास्तविक जातींवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास या गोष्टी आमच्या प्राधान्याक्रमावर आहेत, अशी माहिती देखील सीतारामन (Nirmala Sitharaman Budget 2024) यांनी संसदेत दिली.

देशाचा विकास त्यांच्या विकासात दडलेला आहे. आम्ही त्यांच्या कल्याणासाठी काम करतोय, प्रत्येक घराला पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडून देण्यासाठी काम करण्यात आले आहे. अन्ना संबंधीची समस्या दूर केली, अशी माहिती देखील सीतारामन यांनी दिली.

भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होणार आहे. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करीत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे, असंही निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितलं.

तरुणांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. शेती क्षेत्रातून 3 लाख कोटींचा व्यापार होत आहे. सकल विकासाकडे सरकारचं लक्ष आहे. महिला सशक्तीकरणावर सरकारचा भर असून गेल्या १० वर्षांत महिला उच्च शिक्षण घेत, असल्याची माहिती देखील सीतारामन यांनी दिली.

Latest Posts

Don't Miss