Saturday, January 11, 2025

Latest Posts

‘कीर्ती’ चाचणीसाठी पहाटेच गाठले खेळाडूंनी मैदान

निवड चाचणीच्या प्रक्रियेस प्रारंभ

| TOR News Network |  Kirti Athletics Selection Test : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवा निमित्ताने ‘कीर्ती’ उपक्रमातंर्गत क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत खेळाडू निवड चाचणीस काल दिनांक २३ एप्रिल २०२४ पासून प्रारंभ झाला.(RTMNU Kirti Selection Test Begins) विद्यापीठाच्या रवि नगरातील क्रीडांगणावर खेलो इंडिया केंद्राच्या माध्यमातून आयोजित असलेल्या निवड चाचणीसाठी पहाटे पासूनच खेळाडूंनी मैदान गाठले. पहिल्याच दिवशी विविध भागातील तब्बल ३५० खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्सच्या निवड चाचणीसाठी सहभाग नोंदविला.(350 athlete Respond to Kirti Test)

विद्यापीठ खेलो इंडिया केंद्राच्या माध्यमातून कीर्ती उपक्रम अंतर्गत आयोजित निवड चाचणीची सुरुवात माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी  (Vice Chancellor Dr. Subhash Chaudhary) यांच्या मार्गदर्शनात प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे (Pro-Chancellor Dr. Sanjay Dudhe) यांच्या उपस्थितीत करण्यात आली.  यावेळी विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी,(Director of University Sports and Physical Education Board Dr. Sharad Suryavanshi) माजी संचालक डॉ. धनंजय वेळूकर आणि भारतीय खेळ प्राधिकरणाच्या  निरीक्षक भावना सुतार यांच्यासह समितीतील सदस्य डॉ. आदित्य सोनी, डॉ. मनोज आंबटकर, डॉ. विवेकानंद सिंग, डॉ. नितीन जंगिटवार, डॉ. अमित टेंभूर्णे, डॉ. सुधीर सहारे, डॉ भरत मेहता, सायली वाघमारे, अर्चना कोट्टेवार, गणेश वाणी, नितीन धाबेकर यांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी २०३६ मधील ऑलम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडू तयार व्हावेत म्हणून या निवड चाचणीचे आयोजन केल्याचे सांगितले. (Athletes should be prepared for the Olympics in 2036-Dr.Dudhe) ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारत सरकारच्या क्रीडा व युवक मंत्रालयाच्या प्रतिभावंत खेळाडू शोध मोहिमेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला सहभागी होण्याची संधी मिळाल्याने आनंद होत असल्याचे ते म्हणाले. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत निवड न झालेल्या खेळाडूंना देखील विद्यापीठाच्या विविध केंद्रामध्ये दत्तक घेतले जाईल. पालकांमध्ये देखील जागृती कार्यक्रम राबविले जाणार असल्याचे असे डॉ. दुधे यांनी सांगितले.(Dr. Sanjay Dudhe Guide Players) कार्यक्रमाचे संचालन अर्चना कोट्टेवार यांनी केले. या निवडचाचणी दरम्यान डॉ. पिनाक दंदे यांच्या रुग्णालयाकडून वैद्यकीय सहायता प्राप्त होत आहे.

अ‍ॅथलेटिक्सच्या निवड चाचणीने सुरुवात

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला कीर्ती उपक्रम अंतर्गत ५ क्रीडा प्रकाराची मान्यता मिळाली आहे. (5 sports got approval for kirti )कोणत्याही जिल्ह्यातील ९ ते १८ वयोगटातील मुले व मुली या निवडचाचणीत सहभागी होऊ शकतात. (9 to 18 age group sports person can Participant ) पहिल्याच दिवशी अ‍ॅथलेटिक्स खेळ प्रकारातील रनिंग, थ्रोईंग व जम्पिंगची चाचणी खेळाडूंनी दिली. सुरुवातीला फिजिकल फिटनेस चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ६० मी. स्प्रिंग, बॉल थ्रो, शॉर्टपूट (स्टँडिंग), ६०० मी. धावणे, लांब उडी व उंच उडी आदी प्रकारासाठी मुले व मुलींची निवड चाचणी घेण्यात आली. अ‍ॅथलेटिक्स खेळ प्रकारात नागपूरसह, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा आदी परिसरातील खेळाडू सहभागी झाले होते. (players came from all over vidarbha)

आज कबड्डीची चाचणी

कबड्डी (मुले-मुली) या खेळ प्रकाराकरीता बुधवार, दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ६ वाजता निवड चाचणीस प्रारंभ होणार आहे. यापूर्वी खेळाडूंची फुटवर्क, हॅन्ड टच, टो टच, कॅचिंग अबलिटी आदी विविध चाचण्या देखील होणार आहे. या चाचणीकरिता सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी केले आहे. (Dr.Sharad Suryavanshi appeal to participate)

Latest Posts

Don't Miss