Monday, November 18, 2024

Latest Posts

नागपूर मेट्रोचा १० वा वर्धापन दिन साजरा

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

२०२५ अखेर ८ किलोमीटर मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन करण्याचा मानस: श्री श्रावण हर्डीकर

| TOR News Network | Nagpur Metro Celebrated Its 10th Anniversary : नागपूर २१ : आज नागपूर मेट्रोच्या १० स्थापना दिन मेट्रो भवन येथे साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात नागपूर मेट्रोच्या वर्धापन दिना निमित्य महा मेट्रोच्या वतीने अनेक खेळाचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान सर्व खेळाडूना बक्षिसे वितरण करण्यात आले तसेच मेट्रो कर्मचाऱ्यांना पुरस्कार महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी महा मेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) श्री. अनिल कोकाटे, संचालक (वित्त) श्री. हरेंद्र पांडे, संचालक (प्रकल्प) राजीव त्यागी आणि नागपूर आणि पुणे मेट्रोचे वरिष्ठ आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

वर्धापन दिन निमित्य कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करतांना श्री. हर्डीकर सांगितले कि, १० वर्षाच्या कालावधीत नागपूर मेट्रोने अनेक रेकॉर्ड स्थापित करत चांगले कार्य केले असून मिळणारी प्रशंसा हि संपूर्ण मेट्रो टीमची असल्याचे गौरवपूर्ण उद्गार श्री. श्रावण हर्डीकर यांनी केले. आजचा दिवस नागपूरकरांचा आमच्या प्रति विश्वास आणि शुभेच्छामुळे अधिक महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. सुरुवातीला मेट्रोची प्रवासी संख्या ४०,००० होती पण आज तीच संख्या ८०,००० पर्यंत गेल्याचे ते म्हणाले. पण हे पुरेसे नसून, नागपूर शहरात ९ लाख परिवार राहत असून प्रत्येक परिवारातील एका व्यक्तीने मेट्रोने प्रवास केला तर मेट्रोचे ध्येय साध्य होईल असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

मेट्रो टप्पा दोनच्या कामाला सुरवात झाली असून २०२५ च्या अखेर ८ किलोमीटर मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन सुरु करण्याचा मानस असल्याचे सांगितले. मेट्रोची प्रवासी संख्या सातत्याने वाढत असून प्रवाश्यांच्या सोइ करता लवकरच साडे सात मिनिटांचा हेड-वे (एका स्टेशन हुन सुटणाऱ्या दोन मेट्रो गाड्यांमधील वेळ) करण्याचा प्रयत्न असल्याचे देखील श्री हर्डीकर म्हणाले.

महा मेट्रो रेल प्रकल्पाशी मी सुरुवातीपासून जुळलो असून या प्रकल्पाला मी जवळून बघितले आहे.आपल्या सर्वाना तत्पर राहून मेट्रो ऑपरेशनचे कार्य करायचे आहे. नागपूर मेट्रो फ़ेज – २ मुळे नवीन चैतन्य आले असून रेकॉर्ड वेळेत सदर कार्य पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या वर्धापन दिना निमित्य श्री. हर्डीकर यांनी देशातील सर्वोत्कृष्ट मेट्रोहोण्याचा संकल्प निर्धारित केला.

प्रकल्पाचे कार्य करतांना योग्य रित्या नियोजन केले तर भविष्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही व कार्य गतीने पूर्ण करण्यास मदत मिळेल. नागपूर मेट्रो रेल फ़ेज-१ चे कार्य पूर्ण झाले असून, आता दुसऱ्या टप्प्याच्या कामाकडे लक्ष देण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. सर्व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळे कार्य पूर्ण करण्यास मदत मिळाली असून नागरिकांचा आमच्या प्रति विश्वास देखील महत्वाचा आहे. नागपूर आणि पुणे मेट्रो रेल प्रकल्पामुळे सर्वश्रेष्ठ संस्था म्हणून महा मेट्रोच्या कार्याची नोंद झाली आहे.

NAGPUR METRO PHASE 2 च्या कार्याला सुरुवात

२०१४

• २१ ऑगस्ट २०१४ रोजी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते भूमिपूजन

२०१५ ते २०२३ वर्षात घडलेल्या घडामोडीवर एक नजर :

• १८ फेब्रुवारी २०१५: नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची स्थापना
• २३ जानेवारी २०१७ : नागपूर मेट्रोचे महा मेट्रो मध्ये रुपांतर
• ३० सपटेबर २०१७ : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ट्रायल रनला सुरुवात आणि महा कार्ड लौंच
• २१ एप्रिल २०१८ : एयरपोर्ट साउथ ते खापरी दरम्यान जॉय राईड सुरु
• ८ जानेवारी २०१९ : नागपूर मेट्रोच्या रु.११२१६ कोटी खर्चाच्या फेज- २ मेट्रो प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी.
• ७ मार्च २०१९ : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी द्वारे नागपूर मेट्रो ऑरेंज लाईन(खापरी से सीताबर्डी इंटरचेंज) चे लोकार्पण या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री.नितिन गडकरी आणि इतर मंत्री गण प्रामुख्याने उपस्थित होते.
• २८ जानेवारी २०२० : मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे द्वारे नागपूर मेट्रो अँक्वा लाईन (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर) चे लोकार्पण या प्रसंगी केंद्रीय मंत्री श्री.नितिन गडकरी श्री. हरदीप सिंह पुरी आणि इतर मंत्री गण प्रामुख्याने उपस्थित होते.
• १३ नोव्हेंबर २०२० : वर्धा मार्गवरील डबल डेकर उडडाणपूलाचे उद्घाटन, सदर कार्यक्रमास केंद्रीय मंत्री, रस्ते परिवहन व महामार्ग, आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास, भारत सरकार, राज्याचे गृह मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रामुख्याने उपस्थित होते.
• १ फेब्रुवारी २०२१ – नागपूर मेट्रो फेज – २ आणि नाशिक मेट्रो नियो प्रकल्पाला क्रमश: ५९७६ व २०९२ करोड रुपये ची घोषणा केंद्रीय वित्त मंत्री श्रीमंती निर्मला सीतारामन यांनी लोकसभा येथे केली.
• २० ऑगस्ट २०२१ – १.६ किलोमीटर लांब सिताबर्डी-झिरो माईल स्टेशन-कस्तुरचंद पार्क स्टेशन व फ्रिडम पार्कचे उदघाटन झाले. या कार्यक्रमाला तत्कालीन मा मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री मा. श्री हरदीप सिंग पुरी, केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. कौशल किशोर (व्हिडियो लिंकद्वारे) आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी होते. केंद्रीय मंत्री मा. श्री नितीन गडकरी, तत्कालीन महाराष्ट्राचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री मा. श्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ नितीन राऊत, पशु संवर्धन, दुग्ध व्यायसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. श्री सुनील केदार, विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान सभा मा. श्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला उपस्थित होते.
• ११ जानेवारी २०२२ – महा मेट्रो औरंगाबाद शहराकरिता मेट्रो रेल प्रकल्प व उड्डाणपुलाचा डीपीआर तयार करण्यास सांगण्यात आले
• ४ फेब्रुवारी २०२२ – महा मेट्रोने गड्डीगोदाम (गुरुद्वारा) येथे ८०० टन वजनाचे स्ट्रकचर रेल्वे ट्रॅकवर स्थापित करण्यात आले
• १० जुलै २०२२ – वर्धा मार्गावरील डेबल डेकर पूल व त्यावरील तीन मेट्रो स्टेशन तयार करणारी महामेट्रो व राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाची (एनएचएआय) नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् ने घेतली.
• ६ सप्टेंबर २०२२ – नागपूर मेट्रोला जिओ स्पॅशियल वर्ल्ड – मीडिया क्षेत्रातील एका नामांकित संस्थेतर्फे नागपूर मेट्रो प्रकल्पाला `एक्सलंस मेट्रो प्रकल्प अवॉर्ड’ मिळाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि नागरी उड्डयन राज्य मंत्री श्री व्ही के सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
• ७ डिसेंबर २०२२ – वर्धा रोड डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर म्हणून अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
• ११ डिसेंबर २०२२ – महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सेंट्रल एव्हेन्यू आणि कामठी मार्गावरील मेट्रो रेल्वे सेवेचे उद्घाटन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले तसेच नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज – २ चा शिलान्यास देखील या दिवशी पार पडला.

Latest Posts

Don't Miss