Saturday, January 11, 2025

Latest Posts

मुंबईत 200 हून अधिक इमारतींना स्टॉप वर्क नोटीस

Mumbai Pollution Latest News: दिल्ली पाठोपाठ आता मुंबईत देखील वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे.त्यामुळे मुंबईकरांचा जीव घुटमळत आहे.मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) खराब श्रेणीत आला असून प्रदुषणाचा स्तर 300 पार गेला आहे.त्यामुळे प्रदुषाणाचे गांभीर्य लभात घेता बीएमसीकडून काल 6690 इंटीमेशन नोटीस बजावण्यात आल्या आहे. तर 200 हून अधिक इमारतींना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आल्या आहेत. (BMC Issue Stop Work Notice To Ongoing Building Projects )

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह मुंबईत वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे, वाहनांचा धूर यामध्ये फटाक्यांच्या धुराची भर पडल्यामुळे दिवाळीमध्ये प्रदूषण नेहमीच वाढते. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन घातले होते. मात्र ही मर्यादा कुठेही पाळली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तब्बल ७८४ गुन्हे दाखल केले आहेत. तर, ८ ते १० या वेळेमर्यादेपलिकडे जाऊन फटाके फोडणाऱ्या ८०६ जणांविरोधात कारवाई करण्यात आली.यासह दीड हजार किलोमीटरहून अधिक रस्ते स्वच्छ करण्यात आले आहेत..तर बाहेरून येणाऱ्या मोठ्या वाहनांचीही पीयुसी तपासली जात आहे.मुंबई सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई आणि परिसरातील महापालिका अधिकाऱ्यांना वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता पातळी अत्यंत खालावली असून अतिशय गंभीर बनली आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी श्वसनासंबंधीचे आजार वाढले आहेत. प्रदुषणाचे गांभीर्य लक्षात घेता बीएमसी अॅक्शन मोडमध्ये आली आहे.

Latest Posts

Don't Miss