Thursday, January 16, 2025

Latest Posts

अंबानी सुरक्षेवरचा करतात यॆवढा खर्च

या महागड्या गाड्या असतात ताफ्यत

Mukesh Ambani Security News: देशात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत क्रमांक एकवर असलेले मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार नेहमी चर्चेत असतो. नुकतेच अंबानी यांना धमकी आली होती.त्या निमित्त आपण अंबानीच्या सुरक्षे बद्दल जाणून घेणार आहोत.अंबानी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. त्यात जवळपास 20 पेक्षा अधिक जवान तैनात असतात. यासाठी ते महिन्याला लाखो रुपयांचा खर्च करतात.

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वे सर्वा मुकेश अंबानी यांचे कुटुंब देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. अंबानी कुटुंबाची प्रत्येक गोष्ट समाज माध्यमांवर आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. देशातल्या या मोठ्या आणि शक्तीशाली उद्योगपती अंबानी यांना अनेकदा जीवे मारण्यासोबतच खंडणीसाठी धमक्या आल्या आहेत.नुकतेच त्यांना 20 कोटी रुपयांसाठी धमकीचा मेल आला होता. यात मात्र पोलीसांनी मेल पाठवणाऱ्याला तेलंगना मधुन अटक केली आहे.अशा नेहमी होत असलेल्या प्रकारामुळे अंबानी यांनी आपली सुक्षा तगडी ठेवली आहे.अंबानी यांचे संरक्षणासाठी 20 पेक्षा अधिक सीआरपीएफचे कमांडो तैनात असतात. या सीआरपीएफ कमांडोच्या फोर्समध्ये हत्यारांसोबत असलेले गार्ड, ड्रायव्हर, त्यांच्यासोबत चालणारे गार्ड, पर्सनल सिक्योरिटी ऑफिसर आणि झडती घेणाऱ्या टीमचा देखील समावेश असतो. अंबानी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान दोन शिफ्टमध्ये काम करतात. सीआरपीएफचे जवान अंबानी याच्या घरा भावती होत असलेल्या हलचालींवर नजर ठेवून असतात.अंबानी आपल्या व परिवाराच्या सुरक्षेसाठी  महिन्याला तब्बल 20 लाख रुपये खर्च करतात. यामध्ये सिक्योरिटी गार्ड यांचं मानधन आणि तैनात असलेल्या गाड्याचा खर्च असतो. अंबानी यांच्या वाहनाच्या ताफ्यात 10 ते 15 गाड्या असतात.अंबानी बुलेटप्रुफ वाहनातून प्रवास करित असून त्यांचे सुरक्षा रक्षक रेंज रोव्हर मध्यॆ असतात.

Latest Posts

Don't Miss