| TOR News Network | Hemant Godse Latest News : महायुतीचा नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. नाशिक लोकसभा जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. (Chhagan bhujbal from nashik lok sabha) मात्र, या जागेसाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आग्रही आहे. या लोकसभेत मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यास खासदार हेमंत गोडसे बंडाच्या तयारीत आहेत. (Godse to contest independently)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेवरून महायुतीमधील तिढा कायम आहे.(Mahayuti nashik seat) या मतदारसंघातील उमेदवारी मिळावी, यासाठी खासदार हेमंत गोडसे मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हेमंत गोडसे यांच्यासह दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी, नाशिकचे पदाधिकारी हे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत.(Godse to meet cm shinde)
हेमंत गोडसे यांच्या १० पानी अहवालात काय लिहिलंय?
महायुतीकडून नाशिकची जागा छगन भुजबळांना दिल्यास शिंदेंच्या शिवसेनेत मोठं बंड होण्याची शक्यता आहे. तसेच पक्ष संघटन बांधणीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हेमंत गोडसे यांच्या बंडाचा फटका नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला बसू शकतो. गोडसे हे नाशिकच्या जागेबाबतचा १० पानी अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.Godse will submit 10 pages report to cm)
नाशिकमधून भुजबळांच्या उमेदवारीला असलेला विरोध पाहता निवडून येण्यातही अडचणीला सामोरे जावे लागू शकते. तसेच भुजबळांच्या उमेदवारी महायुतीची १ जागा कमी होईल. अशा अनेक मुद्द्यांच्या सामावेश अहवालात असल्याची माहिती हाती आली आहे. गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर ते काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांकडे लक्ष लागले आहे.(Godse to discuss with cm) तत्पूर्वी , महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाल्यास हेमंत गोडसे हे बंडाच्या तयारीत आहे. तसेच छगन भुजबळांना उमेदवारी दिल्यास ते अपक्ष लढण्याची शक्यता आहे.