Monday, November 18, 2024

Latest Posts

खासदार गजानन किर्तीकर मातोश्रीचे “लाचार श्री”

| TOR News Network |

Gajanan kirtikar Latest News : शिवसेना उपनेते शिशिर शिंदे खासदार किर्तीकरांविरोधात आक्रमक झाले आहेत.(Shishir shinde on gajanan kirtikar) त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र धाडले आहे. (Shishir shinde letter to cm Shinde) गजानन किर्तीकर यांची पक्ष विरोधी वक्तव्यं केल्या प्रकरणात त्यांची शिवसेनेतून त्वरीत हकालपट्टी करण्याची आणि त्यांना निरोपाचा नारळ देण्याची मागणी केली आहे.

 शिंदे गटातील खदखद बाहेर आली आहे. उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन आलेले खासदार गजानन किर्तीकर यांची शिंदे गटातून लागलीच हकालपट्टी करण्याची मागणी आली आहे.(Shinde Shivsena on Gajanan kirtikar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून किर्तीकरांना नारळ देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्यं केले. (Gajanan kirtikar against shinde sena) विरोधी पक्ष ठाकरे गटाचे बाजू घेतल्याने त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्याची विनंती केली.

गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. (Amol kirtikar news) अमोल किर्तीकर हे गजानन किर्तीकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. खासदार निधी अमोल किर्तीकर यांनी स्वत: च्या प्रचारासाठी, विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र फायदा ठाकरे गटाला झाला. मतदानाच्या दिवशी गजानन किर्तीकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली. त्यामुळे आता त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी उपनेते शिशिर शिंदे यांनी केली.

खासदार किर्तीकर मातोश्रीचे “लाचार श्री” झाले आहेत.(Shishir shinde on matoshree) गजानन किर्तीकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. किर्तीकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. आता गजानन किर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.

Latest Posts

Don't Miss