Sunday, January 12, 2025

Latest Posts

कोणाला किती : कोलकाता नाईट रायडर्स संघावर पैशांचा वर्षाव 

Ipl 2024 Latest News : कोलकाता नाईट रायडर्स टीमने फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादचा पराभव करत आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावले. फायनल मॅचनंतर झालेल्या सोहळ्यात विजेती टीम आणि उप-विजेत्या टीमवरही बक्षिसांचा, पैशांचा वर्षाव झाला. (Money Shower On kolkata Knight Riders Team)

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) चा 17वा सीझन अखेर काल संपला. रविवार (26 मे)चेन्नईमध्ये झालेल्या फायनल मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्स टीमने फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादचा पराभव करत आयपीएल 2024 चे विजेतेपद पटाकावले.(kolkata knight riders) कोलकाताने शेवटच्या मॅचमध्ये ८ गडी राखू विजय मिळवला. या सामन्यात कोलकातासमोर जिंकण्यासाठी अवघ्या 114 धावांचे आव्हान होते, जे त्यांनी अवघ्या 11 ओव्हर्समध्ये पूर्ण केले. या विजयामुळे कोलकाता टीम तिसऱ्यांदा IPL चॅम्पियन बनली आहे.(Kolkata Knight Riders Won IPL 2024)

कोलकाताने मिळवली इतकी रक्कम…

IPL 2024 च्या फायनल मॅचनंतर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये चॅम्पियन संघ आणि उप-विजेत्या संघावरही बक्षीसांचा, पैशांचा वर्षाव झाला. एवढंच नव्हे तर या टूर्नामेंटमध्ये उत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंनाही पुरस्कार देण्यात आले. विजेत संघ कोलकाता नाईट रायडर्स 20 कोटी रुपये मिळाले (Kolkata Knight Riders Won 20 cr) तर रनर-अप ठरलेल्या सनरायजर्स हैदराबादच्या संघाला 12.50 कोटी रुपये देण्यात आले. (SunRisers Hyderabad Won 12.5 cr)

IPL 2024 मध्ये टॉप-4 टीम्सना मिळालेले बक्षीस

  • विजेता टीम (कोलकाता नाइट राइडर्स)- 20 कोटी रुपये • उप-विजेता- (सनरायजर्स हैदराबाद)- 12.5 कोटी रुपये • तिसऱ्या स्थानी असलेला संघ (राजस्थान रॉयल्स)- 7 कोटी रुपये • चौथे नंबर वाली टीम (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)- 6.5 कोटी रुपये

IPL 2024 मध्ये या संघानाही मिळालं बक्षीस

  • सीजन मध्ये सर्वाधिक विकेट्स (पर्पल कॅप)- हर्षल पटेल 24 विकेट (10 लाख रुपये) • सीजन मध्ये सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप)- विराट कोहली 741 रन (10 लाख रुपये) • इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीजन- नीतीश कुमार रेड्डी (10 लाख रुपये) • मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीजन – सुनील नरेन (10 लाख रुपये) • इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सीजन : जेक फ्रेजर-मॅकगर्क (10 लाख रुपये) • फँटसी प्लेअर ऑफ द सीजन- सुनील नरेन (10 लाख रुपये) • सुपर सिक्सेस ऑफ द सीजन- अभिषेक शर्मा (10 लाख रुपये) • कॅच ऑफ द सीजन- रमनदीप सिंह (10 लाख रुपये) • फेअरप्ले अवॉर्ड- सनराइजर्स हैदराबाद • रूपे ऑन द गो-4s ऑफ द सीजन: ट्रेविस हेड (10 लाख रुपये) • पिच अँड ग्राउंड अवॉर्ड : हैदराबाद क्रिकेट एसोसिएशन  (50 लाख रुपये)

Latest Posts

Don't Miss