Saturday, January 11, 2025

Latest Posts

मोदी गो बॅक ही गावागावातील घोषणा

Theonlinereporter.com – May 15, 2024 

Sanjay Raut On Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहुलेक दुसरे काम नाही. ते  देशभरात रोड शो करतात. (Sanjay Raut on modi Road Show) मणिपूरला गेले नाहीत. जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांचे अश्रू पुसा यला गेले नाहीत. (Sanjay Raut Slams Modi) घाटकोपरला 18 लोकांचे मृतदेह सापडलेत, त्यांच्याविषयी संवेदना नाही. आज कदाचित तिथे जाऊन नाटक करतील. मोदी मुंबईत, महाराष्ट्रात जिथे जातील, तिथे पराभव निश्चित आहे” असं संजय राऊत म्हणाले. “महाराष्ट्रातील जनतेने निर्णय घेतलाय. उमेदवार कोणी असो, मोदी नको. मोदी गो बॅक ही गावागावातील घोषणा आहे” असं संजय राऊत म्हणाले. (Modi go back new slogan in maharashtra)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत रोड शो आहे. (Modi Road show in mumbai) पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज महाराष्ट्रात आहेत. (Modi in maharashtra today) या रोड शो वरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “आसाममध्ये भाजपाच्या किती जागा येतात ते बघा. आसाममध्ये भाजपाच्या जागा कमी होणार,(Sanjay Raut on assam election) तिथले मुख्यमंत्री बोलत आहेत” असं संजय राऊत म्हणाले. ‘काशीचा निर्णय तिथली जनता घेईल. मथुरेत हेमा मालिनी हरणार’ असं भाकीत संजय राऊत यांनी केलय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत रोड शो आहे, या पत्रकाराच्या प्रश्नावर त्यांनी ‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी करणारे गृहस्थ आहेत’ असं उत्तर दिलं.

“शिवसेना महाविकास आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्यावर आणलय. (Raut on mahavikas aghadi) पराभवाच्या भीतीने भाजपा प्रत्येक गल्लीबोळात पंतप्रधान मोदींना फिरवत आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली. ‘महाविकास आघाडी मुंबईत 6 जागा लढवत आहे, सर्व 6 जागा जिंकू’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. “पंतप्रधान मोदींना मुंबईत ठाण मांडून बसाव लागतय. तुमच्यावर दररोज भटकण्याची ही वेळ का आली? हे लोकांना कळू द्या” असं संजय राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss