मुलगी व सून विरोधात आरोपपत्र दाखल
Anil Deshmukh Latest News: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख परत एकदा अडचणीत सापडले आहेत.यावेळी त्यांची कन्या पूजा व सून राहत देशमुख यांच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (CBI File Charge Sheet Against Former Home Minister of Maharashtra Anil Deshmukh’s Daughter Pooja And Daughter In Law Rahat)
मुंबईते तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसूलीचे आरोप केले होते. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा हा आरोप होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातील अहवाल तयार केला गेला. हा अहवाल पूजाने लीक केल्याचा आरोप आहे. त्या अहवालात अनिल देशमुख यांनी कोणताही गुन्हा केला नाही, असे म्हटले असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणात सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेत तिवारी आणि अनिल देशमुख यांचे वकील डगा यांना अटकही झाली होती.सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात पूजा हिच्यावर कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. पूजा यांनी हा अहवाल मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील आनंद दिलीप डागासोबत कट रचला होता. त्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अहवाल देण्यासाठी लाच देण्याची योजना केली होती. 29 ऑगस्ट 2021 रोजी हा अहवाल माध्यमांमधून लीक झाला होता.अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख विरोधात सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. अहवाल मिळवण्यासाठी सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनी कथित लाच दिल्याचा ठपका या आरोपपत्रात केला आहे.