Thursday, January 16, 2025

Latest Posts

जागा वाटप : महायुतीत बैठकांवर बैठका, चर्चांच्या फेऱ्या मात्र निकाल शून्य

| TOR News Network | Mahayuti Seat Allocation News : एकाकडे महाविकास आघाडीच्या सर्व ४८ जागांचा तिढा सुटला असून ते जोमाने प्रचाराला लागले आहे. तर दुसरीकडे महायुतीत ८ जागांवर अजून मतैक्य होताना दिसून येत नसल्याने तेथे तिढा कायम आहे.या संदर्भात महायुतीत बैठकांवर बैठका, चर्चांच्या फेऱ्या होत असून निकाल मात्र शून्य आहे. (Mahayuti confused on 8 seats of lok sabha)

प्रचारावरही मर्यादा येण्याची चिंता

मुंबईतील दक्षिण मुंबईसह तीन जागा आणि ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अशा ८ जागांवर अजूनही महायुतीमध्ये मतैक्य झाले नाही. (8 seats of mahayuti yet to declared) आठ जागांवर उमेदवार ठरेल तेव्हा ठरेल, पण प्रचारात आघाडी घेता यावी, यासाठी महायुतीने संयुक्त प्रचाराची रणनीती आखली आहे. परंतु उमेदवार जाहीर न झाल्याने प्रचारावरही मर्यादा येण्याची चिंता महायुतीमधील तिन्ही पक्षातील नेत्यांना आहे.

उमेदवार जाहीर न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या मुंबई वारीनंतर देखील नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स कायम आहे.(Suspense for nashik seat) नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मुंबईत जाऊन नाशिकच्या जागे संदर्भात चर्चा केली. या दोन्ही नेत्यांच्या मुंबई दौऱ्यानंतर देखील नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर झाला नाही. दुसरीकडे छगन भुजबळ देखील गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्ये मुक्काम ठोकून आहे. अजून दोन दिवस नाशिकच्या जागेवर निर्णय होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार जोरात प्रचार करत असताना दुसरीकडे महायुतीचा उमेदवार मात्र अद्याप जाहीर न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.(Mahayuti workers in confusion) राज्यातील मतदानाचा पहिला टप्पा आता सहा दिवसांवर आला आहे. मतदान असणाऱ्या विदर्भातील पाच जागांवर जोरदार प्रचार सुरु झाला आहे. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचार सभा होत आहेत.(Mahavikas aghadi campaign in full swing)

उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा उद्या १४ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि नवरात्रीतील सहावा दिवस साधून भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. भाजपच्या जाहीरनाम्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (BJP’s manifesto will be released tomorrow)

Latest Posts

Don't Miss