Saturday, January 11, 2025

Latest Posts

माढ्याच्या जागेसाठी पेच कायम : देवगिरी-सागरवर भेटीगाठींचा सिलसिला

| TOR News Network | Madha loksabha Latest News : माढा लोकसभा मतदारसंघातील पेच कायम आहे. हा पेच सोडविण्यासाठी महायुतीच्या नेत्यांचा बैठकींचा सिलसिला सुरू आहे. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर तर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर भेट घेतली.(Ramraje naik nimbalkar meet ajit pawar) खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते-पाटील आणि रामराजेंचा तीव्र विरोध आहे. मात्र, भाजपही निंबाळकरांच्या उमेदवारीवर ठाम आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. (Ramraje naik nimbalkar, Ranjit singh naik nimbalkar)

माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्याने मोहिते-पाटील हे बंडाचे निशाण फडकाविण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना चर्चेसाठी तातडीने सागर बंगल्यावर पाचारण केले होते. या बैठकीतील तपशील बाहेर आला नाही. मात्र माढा मतदारसंघातील तिढा सोडविण्याच्या दृष्टिकोनातून भाजपकडून वेगवान हालचाली केल्या जात असल्याचे दिसून आले.

लोकसभेच्या उमेदवारीसाठी डावलण्यात आल्यानंतर मोहिते-पाटील हे कमालीचे आक्रमक झाले आहेत, त्यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. (Mohite patil to join Ncp) जयसिंह मोहिते-पाटील यांनी तर आम्ही तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. तत्पूर्वी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवरत्न बंगल्यावर जाऊन मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. कोल्हे यांच्या भेटीनंतर सायंकाळी पुण्यात एक लग्नात विजयसिंह मोहिते-पाटील आणि ज्येष्ठ नेते शरद पवार एकत्र आले होते. त्यांच्यात अधूनमधून चर्चा सुरू होती, त्यामुळे मोहिते-पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss