Saturday, January 11, 2025

Latest Posts

सरकार मध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी बोल्या लागतात

संजय राऊत यांचे गंभीर आरोप : तर यापेक्षा मोठा स्फोट करेल

Sanjay Raut in New Delhi on Shinde Government : महाराष्ट्रात अधिकाऱ्यांची बदल्याचा लिलाव सुरू आहे. खासदार संजय राऊत यांचे शिंदे सरकारवर गंभीर आरोप.(Sanjay Raut On CM Eknath Shinde Government’s Officers Transfer) शिंदे गटाच्या ‘या’ दोन मंत्र्यावरही निशाणा. त्यांच्याच पक्षाचे सगळे दलाल आहेत, असा घणाघातही राऊतांनी केलाय.तर आरोग्य खात्यातील भ्रष्टाचारासंदर्भात मी पत्र लिहले आहे.जर मला उत्तर नाही मिळाले तर यापेक्षा मोठा स्फोट करेल असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या आरोग्य खात्यात लाखोंचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला आहे. आरोग्य विभागातील भ्रष्टाचार हा गंभीर विषय आहे. कारण गोरगरीब जनतेच्या जगण्याचा हा विषय आहे.बदल्यांचे पैसे गोळा करण्यासाठी OSD लेव्हल चे अधिकारी नेमले आहेत. ते पैसे कात्रजच्या कार्यालयात पोहचवले जातात… तिथं कोणाचं ऑफिस आहे हे आपल्याला माहीत आहे. मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.मी साडेतीन हजार पानाचे पुरावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले आहे. आरोग्य खात्यातील भ्रष्टाचारासंदर्भात कोणाला अधिक पुरावे हवे असतील तर तुमचा अधिकारी पाठवा. मी आणखी पुरावे देतो. बदल्यांची औक्षण पद्धत काही दिवस आधी वनखात्यात होती. मी राज्यसभा सदस्य म्हणून पत्र लिहिलं आहे. जर मला याच उत्तर आलं नाही तर मी यापेक्षा मोठा स्फोट करेल, असा गर्भित इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.ललित पाटील प्रकरणात आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि दादा भुसे यांचा यात सहभाग आहे का?, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. या दोघांच्या सहभागाशिवाय या गोष्टी घडणार नाहीत, असं राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss