Saturday, January 18, 2025

Latest Posts

आचारसंहितेपूर्वी  रेकॉर्ड ब्रेक चार हजार ८७७ जीआर; कोट्यावधींच्या कामांसाठी निधी मंजूर

| TOR News Network | Maharashtra Sarkar Latest News : लोकसभेच्या निवडणूकांसाठी राज्यात आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. हे तक्षात घेता राज्य सरकारने तडकाफडकी अनेक निर्णय घेतलेत.(Maha govt pass 4877 GR ) यात १ जानेवारी ते १३ मार्च २०२४  या कालावधी दरम्यान सरकारने ४ हजार ८७७ निर्णय घेतलेत. विशेष म्हणजे यात विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून शंभर टक्के निधी खर्च करण्यात येत आहे.(Before code of conduct Maha gov in Action)

काम करताना वेगवान शासन निर्णय

राज्यातील सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस (उपमुख्यमंत्री अजित पवार गट), शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) व भाजप लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. ‘अब की बार ४०० पार’ यादृष्टीने काम करताना वेगवान शासन निर्णय व १०० टक्के निधी खर्च या बाबींकडे सरकारमधील मंत्री व लोकप्रतिनिधी लक्ष ठेवून होते. (Maha govt took Fast dicussion) लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या दोन बैठका घेतल्या.

भरघोस निधी मंजूर करून कामांचे भूमिपूजन

आता रात्रंदिवस मंत्री, वरिष्ठ अधिकारी काम करीत आहेत. विविध विकास कामांच्या उद्‌घाटनांचा जोर वाढला आहे. राज्य सरकार, जिल्हा नियोजन समिती व विविध हेडअंतर्गत भरघोस निधी मंजूर करून कामांचे भूमिपूजन केली जात आहेत. त्यातच राज्य स्तरावरून शासन निर्णयाची गती देखील वाढली आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, सहकार, पणन, पर्यावरण, वित्त, सामान्य प्रशासन, गृह, उच्चशिक्षण, गृहनिर्माण, उद्योग व ऊर्जा, सार्वजनिक आरोग्य, नियोजन, नगरविकास, ग्रामविकास, महसूल व वन, शालेय शिक्षण व क्रीडा, सामाजिक न्याय, पर्यटन, जलसंपदा, महिला व बालकल्याण, इतर मागास बहुजन कल्याण अशा विभागांचे शेकडो शासन निर्णय अवघ्या काही दिवसांत निघाले आहेत.त्या शिवाय जिल्हा नियोजन समितीचा निधी देखील खर्च करण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss