Monday, November 18, 2024

Latest Posts

गडकरींनी पाठवली खरगे यांना कायदेशीर नोटीस

Nitin Gadkari Interview News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एक मुलाखत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. मात्र पोस्ट करता वेळी ही मुलाखतीचा अपूर्ण व्हिडिओ  टाकण्यात आला आहे. या प्रकारामुळे काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना महागात पडलंय.महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडिया टीमने काँग्रेसला कायदेशीर नोटीस पाठवलीय. (Nitin Gadkari Legal Notice to Mallikarjun Kharge)

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाखतीचा काहीसा भाग पोस्ट करणं काँग्रेस अध्यक्षांना महागात पडलंय. गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवलीय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा खोटा आणि दिशाभूल करणारा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडिया टीमने काँग्रेसला कायदेशीर नोटीस पाठवलीय.(Gadkaris Fake Video Post By Congress) चुकीची माहिती पसरवण्याचा आणि राजकीय फायदा मिळवण्यासाठी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपने काँग्रेसवर केलाय. या गोष्टी कोणत्याही किंमतीत खपवून घेतले जाणार नाही, असं महाराष्ट्र भाजपनं म्हटलंय.

मोदी सरकारचे मंत्री म्हणतात…..

दरम्यान काँग्रेसने केंद्रीय परिवहन मंत्री  नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलाय. गडकरी यांनी १ मार्च रोजी ‘द लॅलनटॉप’ला दिलेल्या मुलाखत दिली होती. या मुलाखतीचा १९ सेकंदाची क्लिप काँग्रेस सोशल मीडियावर पोस्ट केलीय. आज गावातील गरीब, मजूर , शेतकरी दु:खी आहेत, नितीन गडकरी म्हणत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.(Farmers Are not Happy says Gadkari) गावात चांगले रस्ते , पिण्यासाठी शुद्ध पाणी, चांगली रुग्णालये आणि चांगल्या शाळा नाहीत म्हणून दुःखी असल्याचं गडकरी म्हणत असल्याचं या क्लिपमध्ये दिसत आहे.हा व्हिडीओ शेअर करताना काँग्रेसने लिहिलंय, ‘ मोदी सरकारचे मंत्री म्हणतात- आज शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी देण्याचे काँग्रेसचे वचन आहे. मोदी सरकारमध्ये गावे आणि आदिवासी भाग अडचणीत असल्याचे नितीन गडकरी सांगत असल्याचं व्हिडिओ काँग्रेसने दाखवले आहे.

गडकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर बोलत आहेत

गावातील अर्थव्यवस्था (Economy) सुधारण्यासाठी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं गडकरी या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. ‘द ललनटॉप’मधील नितीन गडकरींची संपूर्ण मुलाखत पाहिल्यानंतर काँग्रेसने शेअर केलेल्या या अर्धवट व्हिडिओचे वास्तव समोर आले आहे. १ तास ४२ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये १५ मिनिटांनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर बोलत आहेत. व्हिडिओमध्ये १५.२० ते १५.४५ च्या टाइमस्टॅम्प दरम्यान, नितीन गडकरींना शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न विचारला गेलाय. त्या प्रश्नाचे उत्तर गडकरी देत आहेत.

Legal Notice To Congress President Mallikarjun Kharge

Latest Posts

Don't Miss