Monday, January 13, 2025

Latest Posts

शिवराजसिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजना आणली अन् मुख्यमंत्रीपद गेलं

| TOR News Network |

Jayant Patil Latest News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेच्या सभागृहात जोरदार फटकेबाजी केली.(Jayant Patil in Assembley) जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच टोले लगावले.(Jayant Patil On Cm Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची घोषणा केली.( majhi ladki bahin yojana) याच घोषणेवरुन जयंत पाटील यांनी टोले लगावले.(Jayant Patil On majhi ladki bahin yojana)

“भाजपने जाहीरनाम्या काय म्हटलं होतं ते बघा. पाच वर्षात दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणार, एक कोटी रोजगार निर्माण करणार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणार”, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपचा मागील विधानसभेचा जाहीरनामा वाचून दाखवला.(Jayant Patil On Bjp manifesto) “अजित दादा हा भाजपचा जाहीरनामा आहे. तुम्ही-आम्ही तेव्हा सोबत होतो. भाजपने घोषणा केली. पण ते जनतेला काही दिलं नाही, म्हणून जनता यांना विचारत नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.

“अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण ही नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी कशी होणार ते कळेलच. आता तुम्हीच सांगितलं की, महिलांची तहसील कार्यालय परिसरात गर्दी फार उसळलेली आहे. त्यामुळे त्या सगळ्या बहि‍णींना संपत्तीतला योग्य वाटा मिळायला हवा. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातला 50 टक्के वाटा महिलांना मिळायला पाहिजे.(Jayant PAtil On Buget) आपल्या बघिणींचा तो अधिकार आहे. त्यामुळे तो वाटा दिला म्हणून काही बिघडत नाही. दिलंच पाहिजे”, असं जयंत पाटील म्हणाले.

“आमच्या महाराष्ट्रातल्या बघिणींचा जसा घरावर, संपत्तीवर 50 टक्के वाटा आहे, अगदी वारसा हक्क लावताना सुद्धा बहिणीचं एनओसी नाही आली तर तिला तेवढा हक्क जातो. तसं या बजेटमध्ये बहि‍णींचा अधिकार आहे. यातील 50 टक्के बहि‍णींना त्यांचा वाटा देण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. मागच्या काळात शिवराजसिंह चौहान यांनी लाडली बहीण योजना राबवली होती.(Jayant Patil on Shivraj singh chauhan) त्या राज्यात ही योजना बरीच लोकप्रिय झाली. शिवराजसिंह चौहान यांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही. एकनाथ शिंदे यांना हे माहिती आहे की नाही, ते मला माहिती नाही. त्यांनी स्वत: ती योजना मांडली नाही. त्यांनी मांडायला लावली अजित पवार यांना”, अशी टोलेबाजी जयंत पाटील यांनी केली.

Latest Posts

Don't Miss