Saturday, January 11, 2025

Latest Posts

एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी छापा

IT Raid On Pradeep Sharma मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Encounter Specialist Pradeep Sharma It Raid ) संबंधित वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने नेमका छापा का टाकला असावा? अशी चर्चा आता सुरु झालीय.

एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. (Income Tax Raid in Mumbai ) प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आहेत. ( Former Mumbai Police Officer Pradeep Sharma) त्यांची एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख बनलेली होती. (Mumbai Police Encounter Specialist) त्यांच्या घरी आज आयकर विभागाने छापा टाकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाकडून या प्रकरणात काही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे.

प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आहेत. ते वर्षभरापासून अधिक काळ जेलमध्ये होते. त्यानंतर नुकतंच त्यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर झाला होता. ते जामिनावर बाहेर होते. त्यांचं अंधेरी आणि आणखी एका ठिकाणी निवासस्थान असल्याची माहिती मिळत आहे. या सगळ्या प्रकरणात आयकवर विभागाची छापेमारी सुरु आहे. प्रकरण नेमकं काय आहे याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण सूत्रांकडून याबाबत प्राथमिक माहिती मिळाली आहे की, प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाची टीम दाखल झाली आहे. तिथे सर्च ऑपरेशन सुरु आहे. (It Search Operation at Pradeep Sharmas Home)

नेमकं प्रकरण काय?

आयकर विभाग साधारणत: कर वसुली प्रकरणात कारवाई करत असते. एखाद्या व्यक्तीने कर चुकवलेला असेल आणि त्याबाबत आयकर विभागाला माहिती मिळाली तर कारवाई केली जाते. त्याच अनुषंगाने प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाची टीम दाखल झाली आहे. पण हे प्रकरण थेट प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित नाही. एका माजी आमदाराशी संबंधित हे प्रकरण आहे. माजी आमदाराच्या प्रकरणाचा तपास आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जातोय. सगळी मालमत्तेची पडताळणी केली जात आहे. त्याच अनुषंगाने प्रदीप शर्मा यांच्याशी काही संबंध आहे का, असा तपास सुरु आहे.

Latest Posts

Don't Miss