Saturday, January 11, 2025

Latest Posts

आता बस झाले तातडीने युद्ध थांबवा

जागतिक आरोग्य संघटना काय म्हणाली

Israel Hamas War Update: इस्रायलने आता गाझा शहरातील अल शिफा रुग्णालयाला लक्ष्य केलं असून येथे सातत्याने हल्ले केले जात आहेत.हल्ल्यामुळे रुग्णालयातील मृत्यूची संख्या सातत्याने वाढत असून या रुग्णालयात आता सर्वच सुविधांची वाणवा निर्माण झाला आहे. (Who Says Israel to stop War) यात आता जागतिक आरोग्य संघटनेने उडी घेतली आहे.

इस्रायलने आता युद्धविराम केले पाहिजे, असे जागतिक आवाहन केले जात असतानाही इस्रायलने हल्ले चालूच ठेवले आहेत. टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसूस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, जागतिक आरोग्य संघटनेने अल शिफा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. येथील परिस्थिती भयंकर आणि धोकादायक आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथे वीज, पाणी आणि इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे मुलभूत सुविधा पुरवणे कठीण झाले आहे. परिसरात सातत्याने गोळीबार होत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे रुग्णालयात मृतांची संख्या वाढली आहे. हे रुग्णालय आता रुग्णालयाप्रमाणे कार्य करत नाहीय.सुरक्षित अपेक्षित असलेल्या रुग्णालयात मृत्यू, विध्वंस होत असताना जग शांत बसू शकत नाही. त्यामुळे तत्काळ युद्ध थांबवा असं त्यांनी एक्सवर म्हटलं आहे.मात्र दुसरीकडे इस्रायल आपल्या मतावर ठाम आहे.हमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात ओलीस ठेवलेल्या २४० जणांची सुटका केल्याशिवाय युद्ध थांबवता येणार नाहीहमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात ओलीस ठेवलेल्या २४० जणांची सुटका केल्याशिवाय युद्ध थांबवता येणार नाही असे पंतप्रदान बिन्यामिन नेतान्याहू यांनी दूरचित्रवाहिनीवरून केलेल्या भाषणात सांगितले. इस्रायल लढाईत आपली ‘संपूर्ण ताकद’ लावली असल्याचे ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss