Monday, January 13, 2025

Latest Posts

विदर्भात मुलगी- वडिलानंतर आता काका विरुध्द पुतणी लढणार

| TOR News Network |

Vidarbha Election Latest News : सध्या विदर्भात भाजपने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपुरात होते.(Amit shah Nagpur news) त्यांनी विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला व विजयी संकल्प केला. त्यामुळे भाजप कामाला लागली आहे. (Bjp in Election mode) पण तिकडे शरद पवार यांनी अनेक मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना पुढे केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.(Sharad Pawar to place New Faces in vidhansabha) विदर्भात मुलगी आणि वडिलांचा सामना निश्चित झाल्यानंतर आता काका आणि पुतणी यांच्यात सामना रंगण्याच्या दाट शक्यता वर्तवली जात आहे.(in vidharbha Fight against her uncle)

विदर्भातील अनेक मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने मोठा सुरूंग लावण्याची तयारी सुरू केली आहे.(Mahavikas special plan for vidharbha ) गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरुद्ध त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (bahgyashree atram against father dharmraobaba atram)अगोदरच अंबरीशराजे यांनी दंड थोपाटलेले असताना भाग्यश्री यांनी पण पिक्चर अभी बाकी है, असाच इशारा दिला आहे.

तर दुसरीकडे जिजाऊ माँ साहेबांचं आजोळ असलेल्या सिंदखेड राजा येथे पण मोठ्या घडामोडी घडत आहेत. या मतदारसंघात शिंगणे कुटुंबियांचा वरचष्मा आहे. सहकार महर्षी भास्करराव शिंगणे आणि त्यांच्यानंतर डॉ. राजेंद्र शिंगणे यांना या मतदारसंघाने साथ दिली आहे. पण यंदा शिंगणे कुटुंबातच विधानसभेला सामना रंगणार आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात पुतणी गायत्री शिंगणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.(gayatri shingne to contest election against uncle rajendra shingne)

सिंदखेड राजा मतदार संघात आता बदल पाहिजे. (Shindkhed Raja Constituency) मागील 25 वर्षात विकास कुठेच दिसत नाही. डॉ. शिंगणे यांनी विकासाची पाच कामे तरी दाखवावीत. त्यांनी एक रुपयाचा ही विकास केला नाही. भूमिपूजन करणे, नारळ फोडणे, एव्हढेच काम त्यांनी केले. निवडणूक आलीं की डॉक्टर शिंगणे रडतात आणि भास्करराव शिंगणे यांचे नावाने मत मागतात, अशी खरमरीत टीका गायत्री शिंगणे यांनी काकांवर केली आहे.(gayatri shingne slams uncle rajendra shingne)

वडिलांचे नावाने किंवा आजोबांचे नाव मत मागण्याचा माझा गुण नाही. तुमच्या वडिलांनी ज्या गोष्टी केल्या त्या तुम्ही बंद पाडल्या. त्यांनी शंभर टक्के फसवणूक केली आहे. प्रतिसाद नसल्याने त्यांची मानसिकता बिघडली आहे. मला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. इतर मतदार संघ 25 वर्षात सुधारले, मग सिंदखेड राजा मतदार संघ का नाही सुधारला? असा रोकडा सवाल त्यांनी केला.

शरद पवार यांची भेट झाली. त्यांच्याशी चर्चा झाली. (gayatri shingne meet sharad pawar) कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मी त्यांच्याकडे तिकीटाची मागणी केली आहे आणि शरद पवार हे मला तिकीट देतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मतदारसंघात भास्करराव शिंगणे आणि शरद पवार यांचे नाव आहे, त्यामुळे आपण शंभर टक्के निवडून येणार असा दावा त्यांनी केला.(gayatri shingne clam to win election)

Latest Posts

Don't Miss