Theonlinereporter.com – May 16, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्रात तळ ठोकून होते. आता पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात कसलीही कसर न ठेवण्याचा विडा भाजपने उचलला आहे. अखेरच्या टप्प्यात केंद्रातील आणि राज्यातील झाडून सर्व मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.(Bjp all ministers in election field)
भाजपने अखेरच्या टप्प्यात अधिकाधिक मतदार खेचण्यासाठी सभांचा धडाका उडवून दिला आहे.(Bjp mumbai lok sabha election) मुंबई आणि परिसरात विविध नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. (Bjp all leaders in mumbai campaign) काही नेते मतदारांच्या भेटीगाठीवर भर देत आहे. काही भागात कोपरा बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे. सोशल मीडिया, डिजीटल मीडिया पण दिमतीला आहेच. अखेरच्या टप्प्यात मुंबईत उद्धव ठाकरे गटाला जोर का झटका देण्यासाठी भाजपने खास रणनीती आखली आहे.
राज्यातील लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात भाजपचे केंद्र व राज्यातील मंत्री निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. (BJP all minister leaders in mumbai for election) केंद्र व राज्यातील बडे मंत्री सभा व बैठकांच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, किरेन रिजिजू यांच्या आज सभा आणि बैठका होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री मंगल प्रभात लोढा व उदय सामंत यांच्याही मुंबई व पालघर मध्ये जाहीर सभा आहेत. (Bjp all leader public meeting in mumbai)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रमात व्यस्त आहेत.(Cm Shinde in nashik and kalyan) नाशिकमध्ये सकाळी 11.45 वाजता गंगापूर रोड नाका ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक – हॉटेल सयाजीपर्यंत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मोटारसायकल रॅलीसाठी ते उपस्थिती असतील(Cm Shinde motercycle rally). त्यानंतर कल्याण ते डोंबिवलीत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक च्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रथयात्रेत सहभागी होतील.