Sunday, January 12, 2025

Latest Posts

साताऱ्यात दोन्ही राज्यांच्या मनोमिलनाने राजकीय चर्चांना उधान

| TOR News Network |

Satara Political Latest News : कित्येक वर्षांपासून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र भोसले राजांच्यात असलेलं वैरत्व सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे एकमेकांच्या बंगल्यावर जाणे- येणे या दोन्ही राजेंचे बंद होते. मात्र लोकसभेच्या निवडणुकीपासून दोन्ही राज्यांचे मनोमिलन झाल्याने हे आता दोन्ही राजे एकमेकांच्या घरात येऊ लागले आहेत. (Shivendra Raje Bhosale meet Udayanraje Bhosale )   त्यामुळेच अनेक वर्षानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले देखील जलमंदिर पॅलेस मध्ये आल्याचे पाहायला मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.(Big Political move in satara) साताऱ्याच्या राजकारणात चालंय काय असा प्रश्न या निमित्ताने सर्वांना पडला आहे.

राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्वच नेत्यांची व पक्षांची तयारी सुरु झाली आहे. अद्याप निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला नाही. त्यापूर्वी राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीने विधानसभेसाठी मास्टर प्लॅन तयार केला जात आहे. सातऱ्यामध्ये देखील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या भेठीगाठी वाढल्या आहेत. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र भोसले यांच्यामध्ये राजकीय चर्चा वाढल्या आहेत.( Political discussion between Shivendra Raje Bhosale And Udayanraje Bhosale) त्यांनी एकाच गाडीमध्ये प्रवास केला आहे.या दरम्यान त्यांच्या सोबत कोणाही गाडीत नव्हते हे विशेष.

काही दिवसांपूर्वी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आजारी असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे सुरुची बंगला येथे गेले होते. मात्र त्यांची आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट न झाल्याने आज शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्या थोरल्या बंधूराजांना भेटण्यासाठी जलमंदिर पॅलेस मध्ये गेले होते. या वेळेला तब्येतीच्या विचारपूस तर झालीच त्याच बरोबरच दोन्ही राजे बंधू मध्ये राजकीय चर्चा देखील झाली. त्यामुळे अनेक विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केल्याची चर्चा आता साताऱ्यात सुरू झाली असून विरोधकांनी देखील या दोन्ही राज्यांच्या भेटीचे चांगलीच जास्त घेतल्याचं दिसून येत आहे.

Latest Posts

Don't Miss