Sunday, January 12, 2025

Latest Posts

साजिद नाडियाडवालांमुळे मी पुन्हा राजकारणात आलो – राज ठाकरे

| TOR News Network |

Raj Thackeray Latest News : मी 2000 साली ज्या पक्षात होतो तेव्हा राजकारणाला कंटाळलो होतो. अशात मी फिल्म प्रोडक्शन कडे वळायचे ठरवले होते आणि राजकारणातून रिव्हर्स गिअर टाकला होता. (I put reverse gear from politics) मात्र मित्र साजिद नाडियाडवासोबत झालेल्या चर्चेमुळे मी पुन्हा राजकारणात आलो असा किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एक नंबर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमाच्या वेळी सांगितला.( deu to Sajid Nadiadwala I came back in politics)

 “मी 2000 साली, ज्यावेळी एका वेगळ्या पक्षात होतो, त्यावेळेला त्या पक्षात जे काही राजकारण सुरु होतं त्याला कंटाळून मी एक रिव्हर्सचा गियर टाकला होता. मला असं वाटत होतं की, नको ते राजकारण. मला त्या राजकारणात जायचंच नाही.( Raj Thackeray political story) माझी तशी इच्छाच नाहीय. मला असले गोंधळही घालायचे नव्हते. मला कोणते धक्केही द्यायचे नव्हते”, असं राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray on politics come back)

“मी राजकारण हळूहळू सोडत होतो. त्यावेळेला मी साजिद नाडियावाला अनेकदा भेटायचो आणि बोलायचो की, आपल्या फिल्म प्रोडक्शन सुरु करायचं आहे. (Raj Thackeray to start film production) मला फिल्म प्रोडक्शन सुरु करायचं आहे. मला फिल्म सुरु करायचं आहे, फिल्म प्रोड्यूस करायच्या आहेत, वगैरे वगैरे. एकेदिवशी मी पुन्हा राजकारणात वळण्याचं कारण हे साजिद नाडियावाला आहेत. हेही त्यांचं एक अंग आहे”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“त्यांनी मला फक्त गोष्ट सांगितली, राज भाई मी एक प्रोड्यूसर आहे. प्रोड्यूसर कशाप्रकारे काम करतात ते मला माहिती आहे. काय-काय करावं लागतं ते मला माहिती आहे. राज ठाकरेंना प्रोड्यूसर बनून ते करताना मी बघू शकणार नाही. तुम्ही जिथे आहात तिथेच राहा. चित्रपट बनत राहणार. त्यानंतर मी परत राजकारणात सक्रिय झालो आणि परत त्या गोष्टी सुरु झाल्या”, असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला.

Latest Posts

Don't Miss