Sunday, January 12, 2025

Latest Posts

मुंबई, पुण्यात तुफान पाऊस : विदर्भात मात्र उसंत

| TOR News Network |

Mumbai-Pune Rain News : मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. (Heavy Rainfall in mumbai) आज पहाटेपासून मुंबई उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचलं असून पाण्यातून वाट काढताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्येचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील वाढत्या पावसाचा परिणाम रेल्वेसेवेवर देखील होत आहे.(mumbai local delayed)  त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.तर पुण्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. (Heavy rain in pune) पावसामुळे पुण्यात तिघांना वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.(3 died in pune by eletric shock) तर दोन दिवसांपासून विदर्भात जोरात पडणाऱ्या पावसाने आज उसंत घेतली आहे.

रेल्वेसेवा उशीराने सुरु असल्यामुळे रेल्वे स्थानकावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईच्या रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.(due to rain traffic jam in mumbai) आज मुंबईतच जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. यानुसार आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे.(heavy rainfall from morning in mumbai) मुंबईसह कल्याण, डोंबिवली, ठाणे, या भागांत देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईला आज पावसाने झोडपून काढलं आहे. वाढत्या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजपासून शनिवार 27 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Next 2 days heavy rain in mumbai) तर 28 आणि 29 जुलै रोजी मुंबईत पावसाचा जोर कमी होईल. मात्र पुन्हा 30 जुलैपासून पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

तर उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड आंबेगाव पुणे शिरूर तालुक्याच्या सर्वच भागात रात्री पासून मुसळधार पाऊस कोसळतोय.(pune heavy rainfall) या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आज रेड अलर्ट दिल्याने (Red Alert in pune)पुणे जिल्ह्याधिकार्यालयाकडून आज खेड आंबेगाव जुन्नर तालुक्याच्या पश्चिम घाट माथ्यावरील शाळांना आज सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासांपासून सुरू आहे संततधार पाऊस आहे. डिंभे धरण परिसरात झाला 104 मिलिमीटर पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे अनेक नद्या नाल्यांना पुर आलाय. दरम्यान प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देणार आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. (Ajit Pawar appeal to pune people) पुण्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून त्यांनी चर्चा केली.(On Heavy rain Ajit Pawar Talked on phone to administration officer) यावेळी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव आणि मदतकार्याच्या तयारीचा आढावा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.(disaster team on alert in pune) गरज पडताच नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनीही पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss