Saturday, January 11, 2025

Latest Posts

पुणे हादरलं ; तरुणीचं मुंडकं कापून मृतदेहाचे तुकडे नदीपात्रात फेकले

| TOR News Network |

Pune Crime Latest News : बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारासंबंधी अनेक घटना उघड होत असताना विरोधक आक्रमक झाले आहेत. यादरम्यान आता आणखी एक घटना समोर आली आहे. पुण्यात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.(Pune Girl Murder Case) हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असून धड नदीपात्रात फेकण्यात आलं. (After Murder Pune Girl Body Parts Thrown in River) या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे शहरातून हत्येचा अतिशय भयानक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले आहेत. खराडी येथील नदीपात्रात पोलिसांना तरुणीचे धड आढळले आहे. हत्या झालेल्या खून तरुणीचं वय अंदाजे 18 ते 30  असावे असा अंदाज आहे. आरोपीने हा गुन्हा करताना क्रौर्याचा कळस गाठला. अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. मृत तरुणीची कोणालाही ओळख पटवता येऊ नये यासाठी आरोपीने धडापासून हात-पाय आणि मुंडकं वेगळं केलं. धारदार शस्त्राच्या सहाय्याने त्याने हे अवयव कापले व धड नदीपात्रात फेकून दिलं.

चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून याप्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. हत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे.  दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे.

Latest Posts

Don't Miss