Saturday, January 11, 2025

Latest Posts

फडणवीस,शिंदे, पवारांची वर्षावर रात्री 2 वाजेपर्यंत बैठक

| TOR News Network |

CM & DCM Late Night Meeting News : काल मुंबईत रात्री उशिरा मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षावर आधी उपमुख्यमंत्री अजित पवार तर नंतर देवेंद्र फडणवीस दाखल झाले. (Fadnavis,Ajit Pawar At varsha) यावेळी या तीनही नेत्यांमध्ये अतिशय महत्वाची चर्चा झाल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे या बैठकीत अजून कोणी चौथा व्यक्ती उपस्थित नव्हता. (Fadnavis,pawar late night meeting at varsha) या बैठकीत पावसासोबतच विधानसभा निवडणूक व त्याच्या रणनीती संदर्भातही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा सुमारे दीड तास बैठक चालली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघंही उपस्थित होते. राज्यात गुरुवारी (25 जुलै) झालेला मुसळधार पाऊस आणि पुरामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.(Meeting at varsha In heavy rain) मात्र, या बैठकीत विधानसभा निवडणुकीवरही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात गुरुवारी अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुरामुळं गंभीर परिस्थिती निर्माण झाली. राज्यातील याच आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, दीड तास चाललेली ही बैठक रात्री दोनच्या सुमारास संपली.(Varsha Bunglow late night meeting)

गुरुवारी राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे, कोल्हापूर, रायगड या भागात जवानांसोबतच एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलही बचाव कार्यासाठी अलर्ट ठेवण्यात आलं होतं.(Disaster management on alert at maharashtra) पुण्यातील नागरिकांना एअरलिफ्टनं सुरक्षितपणे बाहेर काढलं गेलं. आज सकाळपर्यंत पुण्यातील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून, अद्यापही काही भागात पाण्याचा पूर्ण निचरा झालेला नाही. पुण्याला बसलेला पुराचा तडाका आणि एकूणच राज्यातील पावसाची स्थिती यावर रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबतही चर्चा झाल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे.

Latest Posts

Don't Miss