Thursday, January 16, 2025

Latest Posts

पुणे अपघात : आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार

| TOR News Network |

Pune Porsche Accident Case Latest Update : अवघ्या देशात गाजत असलेल्या पुणे हिट अँड रन प्रकरणात दररोज नव नवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत.अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आता अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्ट्मध्ये फेरफार केल्याच समोर आले आहे. (Lab Hod Tampered Accused Blood Report in Pune Porsche Accident Case)

घटनेच्यावेळी अल्पवयीन आरोपी त्याची आलिशान पोर्शे कार चालवत होता. त्याने पुण्याच्या कल्याणीनगर भागातील अरुंद रस्त्यावर भरधाव वेगात पोर्शे चालवून दुचाकीवर बसलेल्या दोघांना उडवलं.(Porsche Car Accident news) यात तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. हा गुन्हा करण्याआधी आरोपी दारु प्याला होता. तो दोन पबमध्ये गेला होता. एका पबमध्ये त्याने 48 हजार रुपये उडवले. त्यात दारुच बिल सुद्धा होतं. ते बिल सुद्धा पोलिसांकडे आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दारु पार्टी करताना दिसला आहे.(Pune Car Accident CCTV Footage) त्यामुळे त्याचा ब्लड रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. (Blood Report major role) पोलिसांनी अजून त्याचा ब्लड रिपोर्ट काय आहे? त्याची माहिती दिलेली नाही. ब्लड रिपोर्टमधून आरोपीने त्यावेळी मद्य प्राशन केलेले की, नाही? ते समजू शकते. त्यामुळे हा ब्लड रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे.

पण आता ब्लड रिपोर्टमध्येच फेरफार झाल्याची शक्यता दिसत आहे. डॉ.अजय तावरे यांची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरु होईल, त्यावेळी या प्रकरणात अजून धक्कादायक गंभीर बाबी समोर येऊ शकतात. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी पडद्यामागे काय-काय चालू आहे? हे यातून दिसतय. याआधी ड्रायव्हरला मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला. त्याला बंगला, पैसा, हे आमिष दाखवण्यात आलं. तो ऐकत नाहीय हे लक्षात आल्यावर डांबून ठेवण्यात आलं. हे सगळ खूप भयानक आणि गंभीर आहे. कायद्याला वाकवण्यासाठी काय-काय चाललय ते यातून दिसतं.

Latest Posts

Don't Miss