| TOR News Network |
Amit Shah Latets News : अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौ-याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.यात त्यांनी विधानसभा निवडणुकीवर अधिक फोकस केला आहे. अशात ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत त्यांना रणनीती सांगत आहेत.(Amit Shah meeting in Maharashtra with party workers) संभाजीनगरमध्ये भाजपची बैठक झाली यावेळी अमित शाहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय. तुम्ही कोणतीही चिंता करू नका. ठाकरे गट, पवार गट, काँग्रेस सर्वांचे कार्यकर्ते फोडा असे वक्तव्य भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (break the activist of mahavikas aghadi says Amit Shah) यांनी केले आहे. (Amit Shah on mahavikas aghadi) अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिलेल्या या आदेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अमित शाह नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. अमित शाहांची नाशिकमधील डेमोक्रेसी हॉटेलमध्ये बैठक घेतली. नाशिक विभागाच्या 47 जागांचा आढावा अमित शाह यांनी घेतला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
महाराष्ट्रात सगळे विरोधी पक्ष आपल्या विरोधात उभे आहेत. आता त्यांना दाखवून द्यायचे आहे. त्यामुळे ही निवडणूक ताकदीने लढवा. सगळ्या देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीवर आहे. लोकसभेत विरोधी पक्षांनी जो नेरेटिव्ह सेट केलाय तो खोडून टाका. एकजुटीने महायुतीचे काम करा असा कानमंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाशिकच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.(Amit shah to nashik party worker) शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असं वक्तव्य देखील अमित शाह यांनी केले आहे.
मराठवाड्यातील 30 जागा महायुती जिंकेल असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केलाय. (Amit Shah on marathwada 30 seat wins) संभाजीनगरमध्ये भाजपची बैठक झाली यावेळी अमित शाहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय. तुम्ही कोणतीही चिंता करू नका, सर्व चिंता नेत्यांवर सोडू आणि तुम्ही कामाला लागा असं अमित शाहा म्हणाले तसेच 10 टक्के मतदान वाढवण्याच्या सूचना अमित शाहांनी कार्यकर्त्यांना दिल्यात.